शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यातील सोमलिंग तलाव कात टाकणार

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

सव्वादोन कोटी मंजूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून होणार कायापालट

सुरेंद्र शिराळकर- आष्टा =आष्टा शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना आष्टा परिसरात महादेवाची आठ लिंगे स्थापन केली, अशी अख्यायिका आहे. यातील एक सोमलिंग तलावाच्या काठावर सोमेश्वर लिंग म्हणून प्रसिध्द आहे. या सोमेश्वर तलावाच्या ठिकाणी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून सव्वादोन कोटी खर्चून परिसर विकसित करण्यात येणार आहे.आष्टा शहरात श्री त्र्यंबकेश्वर मर्दवाडी येथील कृष्णा नदीच्या काठावर आहे, तर लवंगेश्वर, रामलिंग, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, कपिलेश्वर, सिध्देश्वर, कल्लेश्वर ही सात लिंगे आष्टा येथे आहेत. या लिंगांवरूनच आष्टा शहरास आष्टा हे नाव पडले. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून आष्टा शहरातील महादेवाच्या सात लिंगांचा कोट्यवधी रुपये खर्च करून विकास करण्यात आला आहे. सोमलिंग तळ्याच्या काठावर हेमाडपंथी दगडी कोरीव काम केलेले सोमेश्वराचे मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे. प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस येथे भाविक गर्दी करतात. या मंदिरासमोरच पालिकेने तीर्थक्षेत्र योजनेतून सभागृह बांधले आहे. मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी पालिकेने येथील झाडे तोडली आणि या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले. आष्टा शहरात कोणतीच बाग नसल्याने आष्टा पालिकेने केंद्राकडे दिलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. सरोवर संवर्धन योजनेतून सव्वादोन कोटी रुपये खर्चून सोमलिंग तलावाचा परिसर विकसित करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखून या ठिकाणी नक्षत्र उद्यान वसविण्यात येणार आहे. बगीचा, विविध फुलझाडे, फळझाडे, रस्ते, गणपती विसर्जनासाठी तलाव, फूटपाथ व्ह्यू पॉर्इंट अशाप्रकारे सुंदर असे पर्यटन स्थळ निर्माण करण्यात येणार आहे. माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या तलावाचा विकास करण्यात येत आहे, अशी माहिती नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, उपनगराध्यक्षा संगीता वारे, मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता चंद्रकांत पाटील यांनी दिली.सरोवर संवर्धन योजनेतून सुमारे सव्वादोन कोटी मंजूर झाले असून शहर व परिसरातील सुंदर असे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येत आहे. लवकरच या कामास सुरूवात करणार आहे.- मंगलादेवी शिंदे, नगराध्यक्षा