शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांसाठी आयुक्तांवर फौजदारी!

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

प्रती एरिया सभेत ठराव : कुपवाड नागरिकांचा आक्रमक पवित्रा

कुपवाड : महापालिकेत समाविष्ट असूनही अद्यापपर्यंत अविकसित अवस्थेत असलेल्या कुपवाड शहरासह उपनगरांना एक महिन्याच्या आत नागरी सुविधा देण्यास सुरुवात न केल्यास आयुक्तांवर फौजदारी दाखल करणार असल्याचा ठराव सुधार समितीतर्फे शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रति एरिया सभेत करण्यात आला. याबरोबरच एरिया सभा सुरू करण्यासाठी आयुक्तांना पत्रे पाठविण्याचाही निर्णय यावेळी घेतला. सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने येथील देशभक्त आर. पी. पाटील चौकात प्रती एरिया सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेस जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, आर्किटेक्चर रवींद्र चव्हाण, कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल कवठेकर, माजी अध्यक्ष विजय खोत, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब लवटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. शिंदे म्हणाले की, सांगली, मिरजेच्या मानाने अविकसित असलेल्या कुपवाड शहरात सुविधांची वानवा आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्यामुळे शहर बकाल झाले आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. नगरसेवक निधी नाही म्हणून नागरिकांना सांगतात. तसेच निधीचे कारण सांगून सुविधा देण्याचे टाळतात. परंतु, निधी नसूनही यांचे बंगले कसे काय सुधारत आहेत. भूखंड हाणणे आणि टक्केवारीवर ताव मारण्याचे काम त्यांना जमते. याबरोबरच व्यापारी संघटनेचे अनिल कवठेकर, विजय खोत, रवींद्र चव्हाण यांनीही महापालिका प्रशासनावर जोरदार प्रहार केला. कुपवाडला विकासापासून वंचित ठेवण्याच्या महापालिकेच्या धोरणावर त्यांनी टीका केली. तसेच अरुण रूपनर, गुंठेवारीचे नेते अजय माने, नरसगोंडा पाटील, मनीषा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी सुविधा न दिल्यास कुपवाडची ग्रामपंचायत करा. उपायुक्त व आयुक्तांना शहर बंदी करणार. तसेच कर न भरता त्यातून विकास कामे करण्याविषयीचे ठरावही नागरिकांच्यावतीने करण्यात आले. सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश व्हनकडे, शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील, बाबासाहेब चिंचवाडे, सुधार समितीचे प्रा. आर. बी. शिंदे, मुनीर मुल्ला, धनंजय भिसे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)