पदाधिकारी बदलासाठी २५ रोजी जि. प. सदस्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:01+5:302021-02-20T05:19:01+5:30

जिल्हा परिषदेत एकूण ६० सदस्य संख्या असून त्यापैकी भाजपकडे २५, राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेसकडे ९, रयत आघाडी ४, शिवसेना ३, ...

For change of office bearers on 25th. W. Meeting of members | पदाधिकारी बदलासाठी २५ रोजी जि. प. सदस्यांची बैठक

पदाधिकारी बदलासाठी २५ रोजी जि. प. सदस्यांची बैठक

जिल्हा परिषदेत एकूण ६० सदस्य संख्या असून त्यापैकी भाजपकडे २५, राष्ट्रवादीकडे १४, काँग्रेसकडे ९, रयत आघाडी ४, शिवसेना ३, विकास आघाडी घोरपडे गट २, अपक्ष एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक असे पक्षीय बलाबल आहे. जिल्हा परिषदेत मित्र पक्षाच्या मदतीने भाजपची सत्ता आहे. प्राजक्ता कोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली, त्यावेळी अनेक इच्छुक होते. यावेळी सव्वावर्षानंतर बदल करण्याचे आश्वासन देऊन इच्छुकांना शांत केले होते. याच इच्छुक सदस्यांनी सध्या भाजपच्या नेत्यांकडे बदल करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका महापौर, उपमहापौर निवडीनंतर जिल्हा परिषद पदाधिकारी बदल करण्याचे इच्छुकांना आश्वासन दिले होते. दि. २३ फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर निवड झाल्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी दि. २५ फेब्रुवारीला सदस्यांची सांगलीत बैठक बोलविली आहे. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा अंतिम निर्णय होणार आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

Web Title: For change of office bearers on 25th. W. Meeting of members