कामेरीत शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:47+5:302021-02-20T05:18:47+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...

Celebrating Shiva Jayanti with enthusiasm in Kameri | कामेरीत शिवजयंती उत्साहात साजरी

कामेरीत शिवजयंती उत्साहात साजरी

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जयराज पाटील व डॉ. रणजित पाटील यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख कादंबरीकार दि. बा. पाटील. जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव निळकंठ, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, शिक्षक नेते एस. आर. पाटील, प्रा. दीपक स्वामी, जय भवानी सोसायटी अध्यक्ष दिलीप जाधव, माजी अध्यक्ष शशिकांत पाटील, उद्योजक जे. एम. पाटील, एम. के. जाधव, भास्कर पाटील, नचिकेत निंबाळकर, धनाजी पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.

शुभम पाटील, अक्षय पाटील, रविराज पाटील, नीलेश पाटील यांनी शिवपुतळा चबुतरा व परिसर फुलांनी सजवला होता.

Web Title: Celebrating Shiva Jayanti with enthusiasm in Kameri