शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बोर्डाकडे ३५० कोटी रुपये परीक्षा शुल्क अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

सांगली : सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने परीक्षा शुल्क परत मिळणार काय? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. ...

सांगली : सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने परीक्षा शुल्क परत मिळणार काय? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. देश-विदेशांतील १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी ३५० कोटी व सात लाख शिक्षकांनी प्रशिक्षणासाठीचे १०० कोटी असे एकुण ४५० कोटींहून अधिक रक्कम बोर्डाकडे जमा केली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या देश-विदेशांत २२ हजार शाळा आहेत. बोर्डाने दहावीच्या परीक्षांसाठी ऑक्टोबरमध्येच फॉर्म भरून घेतले होते. प्रत्येकी १ हजार ८५० रुपये परीक्षा शुल्क घेतले. सहा विषयांव्यतिरिक्त जादा विषयांसाठी ३०० रुपये अतिरिक्त घेतले. सुमारे १९ लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पण लॉकडाऊनमुळे परीक्षा रद्द केल्याने ३५० कोटींचे परीक्षा शुल्क बोर्ड परत करणार काय? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. बोर्डाने परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर करताना परीक्षा शुल्काविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, स्टेशनरी व अन्य वाहतुकीचा खर्च परीक्षा शुल्कातून केला जातो. आजमितीस छपाई झाल्याचे मान्य केले तरी प्रतिविद्यार्थी ३०० रुपयांचा खर्च वगळून उर्वरित १५५० रुपये परत करावेत, असा पालकांचा सूर आहे.

लॉकडाऊन काळात पालकांची आर्थिक कोंडी झालेली असताना बोर्डाने विविध शुल्कांमध्ये कोणतीही सवलत दिली नव्हती, या स्थितीत परीक्षा शुल्क परत करणे ही बोर्डाची जबाबदारी असल्याचा दावा पालकांनी केला.

चौकट

शिक्षक प्रशिक्षणाचे १०० कोटी अडकले

दरम्यान, सीबीएसईच्या शिक्षकांसाठी बोर्डाने यंदापासून प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्या आहेत. प्रत्येकी १५०० रुपये भरून वर्षभरात किमान १५ प्रशिक्षण वर्गांना हजेरी सक्तीची आहे. सुमारे सात लाख शिक्षकांनी १०० कोटी रुपये जमा केले आहेत. कोरोना व लॉकडाऊनमध्ये वर्षभर शाळा बंद असल्याने १५ प्रशिक्षण कार्यशाळा होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे बोर्डाने प्रशिक्षण शुल्काचे १०० कोटी रुपयेदेखील परत करण्याची शिक्षकांची मागणी आहे.

चौकट

- सीबीएसईच्या देश-विदेशातील शाळा - २२,०००

- विद्यार्थी संख्या - १८ लाख ८९ हजार ८७८

- भरलेले परीक्षा शुल्क - ३४९ कोटी ६२ लाख ७४ हजार ३०० रुपये

- सात लाख शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी भरलेली रक्कम - सुमारे १०० कोटी रुपये