मिरजेत ख्वाजा वसाहतीत दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:26+5:302021-03-07T04:23:26+5:30

मिरज : मिरजेत ख्वाजा वसाहतीत शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी जानी हुसेन मुल्ला व हुसेन बशीर मुजावर या दोघांची घरे ...

Burglary at two places in Miraj Khwaja Colony | मिरजेत ख्वाजा वसाहतीत दोन ठिकाणी घरफोडी

मिरजेत ख्वाजा वसाहतीत दोन ठिकाणी घरफोडी

मिरज : मिरजेत ख्वाजा वसाहतीत शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी जानी हुसेन मुल्ला व हुसेन बशीर मुजावर या दोघांची घरे फोडून सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत मिरज गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ख्वाजा वसाहतीत चोरट्यांनी शाळा क्रमांक २५ जवळ राहणाऱ्या जानी हुसेन मुल्ला यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडली. तिजोरीत ठेवलेले पाच तोळे सोने व ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सकाळी बंद खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे मुल्ला यांच्या लक्षात आले.

येथून जवळच अबू बकर मशिदीजवळ रिक्षाचालक हुसेन बशीर मुजावर यांच्या दरवाजाची कडी काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तिजोरीतील तीन तोळे सोने व अडीच हजार रुपये रोख चोरून नेले. मुजावर कुटुंबीय घरात एका खोलीत झोपले असताना चोरीचा हा प्रकार घडला. चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी येथे तिसऱ्या ठिकाणीही घरफोडीचा प्रयत्न केला; मात्र तेथे चोरट्यांची चाहूल लागल्याने नागरिकांनी आरडाओरडा केला. यामुळे चोरटे पळून गेले. चोरीच्या या घटनांमुळे ख्वाजा वसाहत परिसरात खळबळ उडाली आहे.

चाैकट

रेल्वे स्थानकापर्यंत माग

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथक आणून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. श्‍वानाने रेल्वे स्थानकापर्यंत माग काढला.

Web Title: Burglary at two places in Miraj Khwaja Colony