वड्डी गावाजवळील पूल गर्डर दुरूस्तीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:54 AM2021-04-01T11:54:07+5:302021-04-01T12:03:26+5:30

pwd Bridge Miraj Sangli- पेठ, सांगली, म्हैशाळ रस्ता क्र. 152 वरील किमी 58/00 मध्ये वड्डी गावाजवळ मोठे पूल असून या पुलाचे गर्डर खराब झालेले असल्यामुळे गर्डर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 2 ते 21 एप्रिल 2021 या कालावधीसाठी पादचारी व दुचाकी वाहने वगळता पूल वाहतुकीस बंद ठेवले आहे.

Bridge girder near Waddi village closed for repairs | वड्डी गावाजवळील पूल गर्डर दुरूस्तीसाठी बंद

वड्डी गावाजवळील पूल गर्डर दुरूस्तीसाठी बंद

Next
ठळक मुद्देवड्डी गावाजवळील पूल गर्डर दुरूस्तीसाठी बंदपादचारी व दुचाकी वाहने वगळता वाहतुकीस

सांगली  : पेठ, सांगली, म्हैशाळ रस्ता क्र. 152 वरील किमी 58/00 मध्ये वड्डी गावाजवळ मोठे पूल असून या पुलाचे गर्डर खराब झालेले असल्यामुळे गर्डर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 2 ते 21 एप्रिल 2021 या कालावधीसाठी पादचारी व दुचाकी वाहने वगळता पूल वाहतुकीस बंद ठेवले आहे.

 मिरजकडून कर्नाटककडे जाणारी व कर्नाटकमधून मिरज शहराकडे येणारी वाहतूक सुभाषनगर विजयनगर म्हैशाळ प्रजिमा 41 वरून मिरज बेडग प्रजिमा 45 वरून मिरज शहरात येणे व सोलापूरकडे जाणारी वाहतूक सुभाषनगर विजयनगर म्हैशाळ प्रजिमा 41 वरून पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 वरून वळविण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली आहे.

वड्डी व ढवळी गावातील लोकांनी मिरज शहराकडे जाण्या-येण्यासाठी बोलवाड वड्डी ढवळी प्रजिमा 76 या रस्त्याचा उपयोग करावा. वाहतुक सुरक्षा उपाययोजनाव्दारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश निर्गमीत केले असून जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी एकत्रितपणे कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Web Title: Bridge girder near Waddi village closed for repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.