जतमध्ये टॉवरचे काम भाजपने बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:34+5:302021-03-07T04:23:34+5:30

जत : जत नगरपालिकेचे बोगस ना हारकत प्रमाणपत्र दाखवून व स्थानिक नागरिकांची दिशाभूल करून शहरातील रामराव नगरमधील सर्व्हे ...

BJP stopped work on the tower in Jat | जतमध्ये टॉवरचे काम भाजपने बंद पाडले

जतमध्ये टॉवरचे काम भाजपने बंद पाडले

जत : जत नगरपालिकेचे बोगस ना हारकत प्रमाणपत्र दाखवून व स्थानिक नागरिकांची दिशाभूल करून शहरातील रामराव नगरमधील सर्व्हे नंबर ४६३ मध्ये उभा करण्यात येत असलेल्या टॉवरचे काम भाजप नगरसेवक प्रकाश माने व कार्यकर्त्यांनी बंद पाडले.

हे काम बेकायदेशीर व नगरपालिकेचा ना हरकत परवाना बोगस आहे. आवक जावक रजिस्टरला खाडाखोड करण्यात आली आहे, अशी तक्रार माजी आमदार विलासराव जगताप यांनी प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे केल्यानंतर आवटे यांनी या कामास स्थगिती दिली.

जत नगरपालिका कार्यालयात परवान्याची मूळ प्रत आढळून येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित टॉवर उभारणीकरीता बिगरशेती, वाणिज्य परवाना आवश्यक असताना हा परवाना काढला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने ना हारकत परवान्याची चौकशी करावी असा आदेश प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिला आहे. कायदेशीर पूर्तता करून संबंधित विभागाची रितसर परवानगी मिळेपर्यंत त्या कामास तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

यावेळी नगरसेवक उमेश सावंत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश माने, संतोष मोटे, अजिंक्य सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: BJP stopped work on the tower in Jat