शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

सांगली जिल्ह्यात भाजपकडून मुख्यमंत्री शिंदे गटाला शह देण्याची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 13:48 IST

अशोक पाटील इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा, इस्लामपूर-शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपची पुन्हा नवी खेळी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ...

अशोक पाटीलइस्लामपूर : हातकणंगले लोकसभा, इस्लामपूर-शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपची पुन्हा नवी खेळी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगातून घुसखोरी करण्याचा डाव आखला आहे. भाजप आणि अजित पवार गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्याचे राजकारण शिजत असल्याचे संकेत आहेत.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खा. धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून हातकणंगले लोकसभेसाठी राहुल आवाडे यांच्या उमेदवारीसाठी खतपाणी घालून शिंदे गटाला शह देण्याचे कट कारस्थान सुरू आहे.

इस्लामपूर- शिराळा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, हातकणंगले लोकसभेचे प्रमुख सत्यजीत देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील आदी युवकांची मोट बांधण्यासाठी भाजप पुन्हा रंगभरणी करत आहे. या सर्वच नेत्यांचे टार्गेट आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक आहेत.दोन्ही मतदारसंघात साखर सम्राटांचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ऊस उत्पादकांची ताकद एकवटली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर- शिराळाच्या सिमेला असलेल्या पुणे- बेंगलोर महामार्गालगत साखर कारखानदारीला पूरक असलेला इथोनॉलचा प्रकल्प उभा करत गट निर्माण करण्याची खेळी केली आहे.इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून निशिकांत पाटील यांचे नाव पुढे आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जातो. तरीही या मतदारसंघात भाजपची चाचपणी सुरूच आहे. त्यातच महाडिक गटाचे राहुल आणि सम्राट महाडिक वाळवा तालुक्यात आपला गट सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील, भाजप प्रणित रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा विसर भाजपला पडला आहे.

हातकणंगले लोकसभा इस्लामपूर विधानसभा दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ आहेत; परंतु, युती धर्म सोडून शिवसेनेची गळचेपी करत असल्याचे दिसत आहे; परंतु, आमचे हक्काचे मतदारसंघ आम्ही सोडणार नाही. -आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष, सागर मलगुंडे, तालुकाध्यक्ष शिवसेना

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण