शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत काँग्रेसचाही झाला ‘बिग बझार’

By admin | Updated: April 22, 2015 00:27 IST

भाकीत उलटले : मिरज पॅटर्नच्या विस्तवाने सत्ताधाऱ्यांच्या छपरालाही आग

शीतल पाटील - सांगली जयंत पाटील यांच्या महाआघाडीचा बिग बझार होईल, असे भाकीत काही वर्षांपूर्वी माजी मंत्री मदन पाटील यांनी केले आणि ते खरे ठरले. मात्र त्याच वाक्याचे बूमरॅँग आता कॉँग्रेसवर उलटल्याने महाआघाडीपेक्षाही वाईट ‘बिग बझार’ कॉँग्रेसच्या सत्ताकाळात अनुभवास येत आहे. महाआघाडीच्या बिघाडीस जो मिरज पॅटर्न कारणीभूत ठरला, त्याच पॅटर्नच्या विस्तवाने आता कॉँग्रेसच्या छपरालाही आग लागली आहे.
मिरज पॅटर्नचा अनुभव कसा होता?, असा प्रश्न जयंतरावांना महापालिका निवडणुकीनंतर विचारला होता. तेव्हा स्मितहास्य करीत ‘चांगलाच’ असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले होते. मिरजेतील पदाधिकाऱ्यांनी महाआघाडीच्या शेवटच्या दोन वर्र्षांत अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याला काँग्रेसची साथ होती, हे नाकारून चालणार नाही. आता तीच मंडळी पुन्हा महापालिकेत निवडून आली, पण यंदा त्यांच्या खांद्यावर काँग्रेसचा झेंडा होता. सांगलीच्या जनतेनेही काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकत एकहाती सत्ता दिली. गेल्या पंधरा वर्षांत पालिकेच्या कारभाराचा खेळखंडोबा थांबून एकहाती कारभार व्हावा, एवढीच जनतेची अपेक्षा होती; पण आता ती फोल ठरू लागली आहे.
काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी दोन वर्षांत एका विचाराने कारभार करता आलेला नाही. कधी भुयारी गटार योजनेवरून वाद होतो, तर कधी विकास कामांच्या निधीवरून! गेल्या पंधरा दिवसात तर काँग्रेसअंतर्गत संघर्षाने टोक गाठले आहे. पालिकेत महापौर, गटनेते, स्थायी समिती सभापती ही तीनही महत्त्वाची पदे मिरजेच्या कारभाऱ्यांकडे आहेत. या तीन पदाधिकाऱ्यांत एकवाक्यता नाही. सांगलीतील नगरसेवकांना तर कोणाचेच नेतृत्व नाही. या तीन पदाधिकाऱ्यांच्या मागे फरफटत जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नाही. स्वत:चे हितसंबंध जोपासण्यात मिरज पॅटर्नमधील नेतेमंडळी गुंतली आहेत. सध्या पालिकेतील काँग्रेसमध्ये उघडरित्या तीन गट पडले आहेत. एक महापौरांचा, दुसरा गटनेत्यांचा आणि तिसरा स्थायी सभापतींचा! तीन गटातून एकमेकांवर कुरघोड्या सुरू आहेत. स्थायी समिती सभेत गोंधळ घालणारे महापौर गटाचे, तर महासभेत दंगा करणारे सभापती व गटनेते गटाचे आहेत.
महासभेतील ऐनवेळी घुसडलेले ठराव उधळून लावल्यात आले. त्याच वेळी स्थायी समितीचा गोंधळही चर्चेत आला. आता तर महापौरांनी काँग्रेसला घरचा आहेर देत, काही सदस्यांचे हितसंबंध जोपासण्यास नकार दिल्याने गदारोळ केल्याचा आरोप केला आहे. हा सारा प्रकार किळसवाणा असून, नगरसेवकांना जनतेच्या हिताशीे काहीच देणे-घेणे नाही, असेच म्हणावे लागले.
सोमवारच्या महासभेत काँग्रेसमधील संघर्षाने पातळी सोडली. महापौरांविरोधात सारे एकवटले, पण त्याचवेळी महापौरांवरील राग नगरसचिवांवर काढण्यात आला. तो कितपत योग्य होता? याचे आत्मचिंतन काँग्रेसला करावे लागणार आहे.
महाआघाडीने किमान तीन वर्षे एकमुखी कारभार केला होता. शेवटच्या दोन वर्षात जयंतरावांना हादरे बसले. त्यांचा बिग बझार झाला. पण काँग्रेसची अवस्था तर महाआघाडीपेक्षाही बिकट झाली आहे. सत्तेच्या पहिल्या वर्षापासूनच काँग्रेसमध्ये दुफळी झाली आहे. उलट काँग्रेसचाच बिग बझार झाल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या छपराला आग लागेल, असे कुठल्याच काँगे्रस कार्यकर्त्यांना वाटले नव्हते. पण आता आग लागली असून, ती विझविण्यासाठी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे. हुकूमशाही व मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्यांना चाप लावावा लागेल. अन्यथा महाआघाडीप्रमाणे काँग्रेसची बिघाडी होण्यास विलंब लागणार नाही.

नगरसचिवांची कोंडी
महासभेत नगरसचिवांना मारहाण होण्याची पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना घडली. आजपर्यंत अधिकाऱ्यांचे डोळे काढण्यापर्यंत नगरसेवकांची मजल गेली होती, पण आता थेट हातघाईवरच प्रकरण आले आहे. यापूर्वी शहर अभियंता सी. जी. सोनावणे यांना मारहाण झाली होती. त्या प्रकरणात मदन पाटील यांनी नगरसेवकांची बाजू उचलून धरली. पण नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्या मारहाणीचे प्रकरण वेगळे आहे. नगरसेवक व माजी पदाधिकाऱ्यांचा आततायीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यामागे नगरसचिवांकडून ठरावाच्या प्रती मिळत नसल्याचा राग स्पष्ट होत होता. ठराव दिले जाऊ नयेत, यासाठी महापौरांचा नगरसचिवांवर दबाव असतो, तर नगरसेवक ठरावासाठी आग्रही असतात. या दुहेरी कात्रीत सापडल्याने नगरसचिवांची कोंडी झाली आहे.