शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बँका, एटीएमसमोरील रांगा हटेनात

By admin | Updated: November 15, 2016 23:37 IST

सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी : पन्नास टक्के एटीएम बंद; पैसे मिळविण्यासाठी नागरिकांचे हाल

सांगली : जिल्ह्यातील बँका सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता उघडताच बँकांसमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या. एटीएम केंद्रांवर तर सकाळी आठपासून गर्दी होती. दिवसभरात बँका व एटीएमसमोरील गर्दी हटलेली नव्हती. त्यात शहरातील पन्नास टक्क्याहून अधिक एटीएम बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आणि बदलण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल झाले. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदचा परिणाम आठवडाभरापासून दिसू लागला आहे. सर्वसामान्य नागरिक नोटा बदलण्यासाठी बँकेच्या दारात तासन् तास ताटकळत आहे. तसेच पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर गर्दी होत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारीही आला. सोमवारी बँका व एटीएम बंद होती. मंगळवारी बँका उघडताच नागरिकांनी पुन्हा रांगा लावल्या होत्या. काही एटीएममध्ये सकाळीच पैशाचा भरणा करण्यात आला होता. त्यामुळे अशा एटीएमबाहेर सकाळी आठ वाजता भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरून जाणारे लोकही एटीएम सुरू दिसताच रांगेत उभे राहत होते. शहरातील स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय अशा मोठ्या बँकांसमोर दिवसभर रांगा लागल्या होत्या. स्टेट बँकेच्या गणपती मंदिरजवळील शाखेने नागरिकांच्या सोयीसाठी बाहेर मंडपही घातला आहे. स्टेशन चौकातील पोस्ट कार्यालयात सर्वात मोठी रांग होती. पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते फूटपाथपर्यंत रांग लागली होती. त्यामुळे राजवाडा चौक ते स्टेशन चौक या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. अनेक बँकांसमोर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. एकूणच नोटा बंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम जाणवत होता. (प्रतिनिधी) मिरजेत रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे मिरजेतील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची पंचाईत झाली आहे. दि. २४ पर्यंत खासगी रुग्णालये, औषध दुकानांना जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश आहेत. मात्र वैद्यकीय तपासण्यांसाठी हजार, पाचशेच्या जुन्या नोटा घेण्यात येत नसल्याने नोटा बदलून घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. मिरजेत नामांकित वैद्यकतज्ज्ञांची खासगी रुग्णालये, तसेच मोठी रुग्णालये असल्याने परजिल्ह्यांसह कर्नाटकातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात. आठवड्यापूर्वी अचानक हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, येथील खासगी रुग्णालयांत खर्चिक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचार खर्चासाठी नवीन नोटा मिळविण्याची समस्या आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांसह औषध दुकानदारांना जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आल्याने रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्व खासगी रुग्णालयांत जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी जुन्या नोटांऐवजी धनादेश मागण्यात येत आहे. रुग्णालये व औषध दुकानदार जुन्या नोटा स्वीकारत असले तरी, वैद्यकीय तपासण्यांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांना क्ष-किरण, सीटी स्कॅन, सोनोग्राफी यांसह रक्तासह इतर वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. परगावातून मिरजेत आलेल्या रुग्णांना दैनंदिन खर्चासाठीही नव्या नोटा आवश्यक असल्याने त्यांची पंचाईत होत आहे. आर्थिक टंचाईमुळे शक्य असलेल्या रुग्णांनी उपचार घेणे पुढे ढकलले आहे किंवा काही रुग्ण घरी परत गेले आहेत. नोटांवरील बंदीमुळे मिरजेतील रुग्णालयांत रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)