गव्हाणमध्ये आशा स्वयंसेविका, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:22+5:302021-08-19T04:30:22+5:30

फोटो : गव्हाण (ता. तासगाव) येथे आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अशोक पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच हणमंत ...

Asha Swayamsevak, staff felicitated at Gawhan | गव्हाणमध्ये आशा स्वयंसेविका, कर्मचाऱ्यांचा सत्कार

गव्हाणमध्ये आशा स्वयंसेविका, कर्मचाऱ्यांचा सत्कार

फोटो : गव्हाण (ता. तासगाव) येथे आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अशोक पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच हणमंत पाटील, रावसाहेब सरवदे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथे कोरोनात सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा ग्रामपंचायत व राष्ट्रवादीचे तालुका कार्यकारिणी सदस्य अशोक पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य सेविका एस. एस. चव्हाण, उज्ज्वला जाधव, ऋतुजा देसाई, संगीता घाळे, विद्या काशीद तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष यादव, युवराज सरवदे, एकनाथ पाटील, मनोहर सरवदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच हणमंत पाटील, उपसरपंच रावसाहेब सरवदे, विठ्ठल काशीद, विजय पवार, गौरी पाटील, विजय जाधव, सुशिला काशीद, शारदा साळुंखे, पूजा पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Asha Swayamsevak, staff felicitated at Gawhan