शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बँक हिताच्या निर्णयाबरोबरच कायद्याचे भान हवे

By admin | Updated: June 3, 2015 23:37 IST

जयंत पाटील : जिल्हा मध्यवर्ती बँकेत आढावा बैठक; मोबाईल व्हॅनची पाहणी

सांगली : जिल्हा बँकेच्या प्रगतीच्यादृष्टीने निर्णय घेत असताना कायद्याचे भानही ठेवले पाहिजे, असे मत आ. जयंत पाटील यांनी बुधवारी बँकेच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून विविध योजना व बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यवर्ती बँकेत दुपारी जयंत पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतानाच त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेतला. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्राम देशमुख उपस्थित होते. ते म्हणाले की, नव्याने काही योजना किंवा धोरण आखताना शेतकरी व बँक हिताचा विचार असावा. लोकांनी विश्वासाने बँकेची सत्ता आपल्याकडे सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत कारभार झाला पाहिजे. ही बँक आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम झाली पाहिजे. राज्यातील आदर्श जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून नावाजली जावी, यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकांच्या कालावधीतील काही चांगले निर्णय पुढे चालू ठेवताना, आणखी काही नव्या योजना राबविता येतील का, याचा विचार केला पाहिजे. या सर्व गोष्टी करताना कायद्याच्या चाकोरीतच काम केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी दिली. बँकेच्या मोबाईल व्हॅनची पाहणीही जयंत पाटील यांनी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्हॅनमधील सर्व सुविधांची माहिती दिल्यानंतर, पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी संजय बजाज, मनोज भिसे उपस्थित होते. (प्रतिनिधी)