आष्ट्यात कृषिमंत्र्यांकडून सोयाबीन पिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:13+5:302021-04-11T04:25:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील प्रगतशील शेतकरी नागेश देसाई यांच्या शेतातील उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी राज्याचे कृषिमंत्री दादा ...

Agriculture Minister inspects soybean crop in Ashta | आष्ट्यात कृषिमंत्र्यांकडून सोयाबीन पिकाची पाहणी

आष्ट्यात कृषिमंत्र्यांकडून सोयाबीन पिकाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील प्रगतशील शेतकरी नागेश देसाई यांच्या शेतातील उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

नागेश देसाई यांच्या शेतात झुकेनीच्या केडीएस ७२६ या सोयाबीन बियाणाची कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राच्या वतीने ग्राम बीजोत्पादन प्रकल्प अंतर्गत ३० हेक्टर आर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात दर्जेदार बियाणे उपलब्ध होईल, अशी माहिती नागेश देसाई यांनी दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी बी. डी. माने, एम. ए. निंबाळकर, व्ही. एस. ननवरे, पी. जी. रकटे, कौस्तुभ बारवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो: आष्टा येथील नागेश देसाई यांच्या सोयाबीन बियाणे प्लॉटची कृषिमंत्री दादा भुसे, खासदार धैर्यशील माने यांनी पाहणी केली. यावेळी कौस्तुभ बारवडे, बसवराज मास्तोळी, मनोज वेताळ, बी. डी. माने, एम. ए. निंबाळकर, व्ही. एस. ननवरे, कीर्ती सोकाशी उपस्थित होते.

Web Title: Agriculture Minister inspects soybean crop in Ashta