शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन शॉपिंगचा व्यापाऱ्यांना २५% फटका

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

सांगलीत पंधरा कुरिअरची सेवा : युवा वर्गच सर्वात मोठा ग्राहक; इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी उलाढाल--लोकमत विशेष

अंजर अथणीकर -सांगलीप्रत्यक्ष बाजारात जाऊन चोखंदळपणे खरेदी करण्याची पद्धत आता हळूहळू कमी होत आहे. इंटरनेटच्या पसाऱ्यातून घरबसल्या ग्राहकांनी चोखंदळ होणे पसंद केले आहे. त्यामुळे आॅनलाईन शॉपिंग हा नवा प्रकार आता बाजारपेठ काबीज करू लागला असून, गेल्या सहा महिन्यात सांगलीच्या बाजारपेठेला याचा २५ टक्के फटका बसला आहे. विशेषत: याचा सर्वाधिक फटका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व कपड्याच्या बाजारपेठेला बसत आहे. पर्यायांची उपलब्धता, माफक किमती आणि घरपोहोच सेवा या जोरावर आॅनलाईन शॉपिंगने हळूहळू बाजारपेठेला आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. आॅनलाईन शॉपिंग तसे वर्षापूर्वी सुरू झाले असले तरी, गेल्या सहा महिन्यात हा व्यवसाय अधिक फोफावला आहे. यासाठी सांगलीत आता आॅनलाईन कुरिअर कंपन्यांचीही संख्या वाढली आहे. वर्षापूर्वी सुरू झालेली आॅनलाईन कुरिअर कंपन्यांची संख्या आता पंधराहून अधिक झाली आहे. उत्पादक कंपन्यांबरोबर आॅनलाईन कुरिअर कंपन्यांचा करार झाला असून, उत्पादक कंपन्या त्यांचे साहित्य विमान, रेल्वे, बस व खासगी वाहनांच्या माध्यमातून ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवून देतात. कुरिअर कंपनीमध्ये आलेले साहित्य ग्राहकांना घरपोहोच करण्यात येते. यासाठी कंपनीने वस्तूवर आकारलेली किंमत ग्राहकांकडून घेऊन ती परत उत्पादक कंपनीकडे पाठविण्यात येते. मागणी केलेली वस्तू ४८ तासात ग्राहकांना घरपोहोच मिळते. उत्पादक कंपनी दूरची असेल, तर ग्राहकांना वस्तू मिळण्यास जास्तीत जास्त ७२ तासांचा वेळ लागू शकतो. ग्राहकाकडून पैशाची तजवीज होईपर्यंत तीन दिवसापर्यंत अशा वस्तू कुरिअरच्या गोदामामध्ये ठेवल्या जातात. विनंती केल्यास त्याचा अवधी वाढवला जातो. त्यामुळे ग्राहकांना कंपनीच्या वस्तू थेट व वाजवी किमतीत मिळत असल्याचा कंपन्यांचा दावा आहे. आॅनलाईन शॉपिंगची विश्वासार्हता वाढावी म्हणून प्रत्येक कंपनी प्रयत्न करीत आहे. ग्राहकांच्या नेमक्या अडचणी शोधून त्याबाबतची कंपनीची धोरणे ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे. दररोज शंभरावर ग्राहकांचे कुरिअरसध्या प्रत्येक कुरिअर कंपनीस दररोज सरासरी शंभरावर ग्राहकांना आॅनलाईन शॉपिंगच्या वस्तू पोहोच कराव्या लागत आहेत. सांगली परिसरात रोज दीड हजारावर अधिक ग्राहकांकडून आॅनलाईन खरेदी होत आहे. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्याही वाढत आहे. युवा पिढीचा व श्रीमंत ग्राहकांचा याकडे ओढा वाढल्याची माहिती आॅनलाईन कुरिअरच्या चालकांंनी दिली. आॅनलाईन शॉपिंगचा बाजारपेठेवर सुमारे २५ ते ३० टक्क्यापर्यंत परिणाम झाला आहे. आम्हीही घाऊक प्रमाणात वस्तू मागवतो. मात्र यातील खराब झालेली वस्तू परत मिळविण्यासाठी खूप मानसिक त्रास होतो. त्यासाठी महिनाही उलटून जातो. सध्या युवापिढीला आॅनलाईन खरेदीचा छंद जडला आहे. - हिरो राजमाने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी, सांगली आॅनलाईन शॉपिंगचे अधिक तर ग्राहक युवा पिढी आहे. त्यामुळे फॅशनेबल कपडे, गॉगल्स, मोबाईल, लॅपटॉपचा अधिक व्यवसाय होत आहे. आलेले साहित्य परत जाण्याचे प्रमाण जवळपास दहा टक्के आहे. दिवसेंदिवस याचे ग्राहक वाढत असून, ग्राहकांसाठी हा व्यवहार सोयीचा व वाजवी किमतीत होत आहे. - राहुल कांबळे, कुरिअर व्यावसायिक, सांगलीआॅनलाईन बाजारात मिळते सर्वकाही...आॅनलाईन शॉपिंगद्वारे अलीकडे कडधान्ये आणि किराणा सामानही मागविण्यात येत असले तरी, सर्वाधिक प्रमाण मोबाईल खरेदीचे आहे. त्यासोबत टी शर्ट, जीन्स, तयार कपडे, गॉगल, लॅपटॉप, एलसीडी-एलईडी, संगणक, महागड्या साड्या, अत्तर, सौंदर्यप्रसाधने आदींचा यामध्ये अधिक समावेश आहे. आॅनलाईन विक्री सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाईटच्या जाहिराती प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत असून, वेबसाईटवरून ग्राहक पसंतीच्या वस्तूंची मागणी करीत आहेत. संगणक-मोबाईलवरून नोंदणी करून मागणी केली जाते.