शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगरला १९ लाखांची रोकड जप्त; शेतकरी ताब्यात

By admin | Updated: November 17, 2016 23:54 IST

उशिरापर्यंत चौकशी

 सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील सुभाष चवगोंडा पाटील या शेतकऱ्याच्या मोटारीतून १९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. शहर पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्या पथकाने माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर बुधवारी रात्री दहा वाजता ही कारवाई केली. याबाबत सुभाष पाटील यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. सुभाष पाटील बुधवारी रात्री त्यांच्या मोटारीतून (एमएच १२ ईबी ९८९६) माधवनगरमार्गे कर्नाळला १९ लाखांची रोकड नेणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक दीपाली काळे, संजयनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार संशयित मोटार रात्री दहा वाजता या मार्गावरून जाताना दिसून आली. पथकाने मोटार थांबवून झडती घेतली असता एका बॅगेत पाचशेच्या नोटांची १९ लाखांची रोकड मोटारीत सापडली. यामध्ये नोटांचे ३८ बंडल होते. ही रोकड जप्त करून पथकाने सुभाष पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. ही रोकड पाटील यांनी शेती व्यवसायातील असल्याचा दावा केला आहे; पण यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पाटील यांना सोडून दिले आहे. तसेच त्यांची मोटारही परत केली आहे. मात्र रोकड जप्त करण्यात आली आहे. केंद्र शासनाने गेल्या आठवड्यात हजार, पाचशेच्या नोटांवर बंदी घातली आहे. बाजारात चलनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना एकाचवेळी पाटील यांच्याकडे १९ लाखांची रोकड आली कोठून? याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी संजयनगर पोलिसांना दिले आहेत. गुरुवारी दुपारी पोलिसांनी ही रोकड जप्त केल्याच्या कारवाईची लेखी माहिती आयकर विभागाला दिली आहे. आयकर विभागाचे पथक येत्या एक-दोन दिवसांत संजयनगर पोलिस ठाण्यास भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू करणार आहे. नोटांवर बंदी घातल्यापासून शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. नोटांवरील बंदी, तसेच विधान परिषद, नगरपालिका निवडणुका असल्याने शहरासह जिल्ह्यात सातत्याने नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)