शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बघा, कसं होतंय तुमचं मूल स्वार्थी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 13:18 IST

‘घेण्या’बरोबरच मुलांना ‘देण्या’ची सवय लावण्यासाठी..

ठळक मुद्देलहानपणापासूनच मुलांना घेण्यापेक्षा ‘देण्याची’, शेअर करण्याची सवय लावली पाहिजे.मुलांना कोणतीही गोष्ट देताना किंवा त्यांनी ती हवी असताना शक्यतो दोन पर्याय द्यावेत.मुलं जर स्वार्थीपणाकडे झुकायला लागली, तर त्यांना त्यांच्या नकळत त्याची जाणीव करून देताना देण्याचा आनंदही त्यांना समजावून द्यायला हवा.

- मयूर पठाडेमुलं नेहमीच गोड असतात, गोड दिसतात. त्यांचं कित्ती कौतुक करावंसं वाटतं.. बरोबर ना? पण चुकताय तुम्ही. म्हणजे वर जे निरीक्षण तुम्ही मांडलंय, त्यात खोटं काहीच नाही, पण ते पूर्णत: खरंही नाही. अनेक मुलांच्या लोभस हास्यामागे स्वार्थीपणाही लपलेला असतो. आपल्याला वरवर ते कळत नाही किंवा ‘मुलंच ती, करणारच असं..’ म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. याकडे खूपच बारकाईनं पाहिलं पाहिजे आणि आपली मुलं ‘सगळं मलाच पाहिजे, दुसºयाला काहीच नको’, अशी वागत असली तर त्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्षही दिलं पाहिजे.अभ्यासकांचंही हेच निरीक्षण आहे. मुलं जर स्वार्थीपणाकडे झुकायला लागली, तर त्यांच्या भविष्यावरच त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपली मुलं स्वार्थी बनण्याआधीच काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.स्वार्थीपणापासून मुलांना कसं वाचवाल?१- एकतर मुलांना लहानपणापासूनच घेण्यापेक्षा ‘देण्याची’, शेअर करण्याची जास्तीत जास्त सवय लावली पाहिजे. आपणही तेच करतो, हे आपल्या कृतीतून मुलांना दिसलंही पाहिजे.२- मुलांना कोणतीही गोष्ट देताना किंवा त्यांनी ती हवी असताना शक्यतो दोन पर्याय द्यावेत. ही किंवा ती. म्हणजे एखाद्या गोष्टीला पर्याय असू शकतो आणि त्याच्यावरच्या मालकीहक्कावरची त्यांची भावना कमी होऊ शकते.३- मुलांच्या वागणुकीकडे सातत्यानं लक्ष दिलं पाहिजे. मुलं जर स्वार्थीपणा करायला लागली, तर त्यांना त्यांच्या नकळत त्याची जाणीव करून देताना देण्याचा आनंदही त्यांना समजावून द्यायला हवा.४- मुलं जर काही चिंतेत, काळजीत असतील, एखाद्या गोष्टीच्या अभावामुळे, ती न मिळाल्यामुळे ती दु:खात असतील, तर त्यांचं दु:ख, वेदना त्यांच्या पातळीवर जाऊन समजावून घेताना, ती गोष्ट म्हणजेच सर्वस्व नाही, याची जाणीवही मुलांना करुन द्यायला हवी.५- एखादा निर्णय आपण घेतल्यानंतर त्यावर आपण ठामही राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट मुलासाठी चांगली नाही, हे आपण तारतम्यानं ठरवल्यावर ती गोष्ट मुलासाठी कशी अयोग्य आहे, हे त्याला समजावून देतानाच आपला निर्णय कायमही ठेवायला हवा. चॉकलेट चांगलं नाही, असं म्हणून थोड्या वेळानं चॉकलेटच बक्षीस म्हणून द्यायचं, यातला फोलपणा मुलांना चांगलाच समजतो..