शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

लग्नाआधी पार्टनरसोबत बोला 'या' गोष्टी, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 13:43 IST

एक्सपर्ट्स हे नेहमीच सांगतात की, इच्छेचा संबंध शरीरापेक्षा जास्त मेंदूशी असतो. सध्या जे नवे सर्वे समोर येत आहेत त्यातून मेंदूच्या याच खेळाला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(Image Credit : Filmfare)

एक्सपर्ट्स हे नेहमीच सांगतात की, इच्छेचा संबंध शरीरापेक्षा जास्त मेंदूशी असतो. सध्या जे नवे सर्वे समोर येत आहेत त्यातून मेंदूच्या याच खेळाला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका शोधातून समोर आलं आहे की,  ज्या महिलांमध्ये इमोशनल इंटॅंलिजन्स अधिक असतं, त्यांच्या इच्छाही चांगल्या असतात. 

किंग्स कॉलेज लंडनमध्ये दोन हजाराहून अधिक परिवारांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, अशा स्त्रिया आपल्या भावना आणि जाणिवांबाबत जागरुक असतात. त्या दुसऱ्यांच्या भावनांचीही योग्यप्रकारे काळजी घेऊ शकतात. संबंधांच्या दृष्टीकोनातून हा समजदारपणा गरजेचा असतो. काही एक्सपर्ट्सचं म्हणनं आहे की, पती-पत्नी यांच्यात चांगले आणि नियमीत संबंध असेल तर याने स्त्रियांचा आयक्यू स्तरही वाढतो. ही एक इंटरेस्टिंग बाब आहे. नियमीत शारीरिक संबंध ठेवल्याने अॅस्ट्रोजनमध्ये वृद्धी होते आणि मेंदूची क्रिया वाढते, असे सांगितले जाते. 

काहीतरी फरक आहे

याआधीही काही शोधांमध्ये हे सांगण्यात आले आहे की, स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये अंतर असतं. हे अंतर जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला प्रभावित करतं. पण गेल्यावर्षी झालेल्या एका अभ्यासातून जुन्या शोधांना चुकीचं ठरवलं आहे. त्यात सांगण्यात आलं आहे की, स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूत काहीही फरक नाहीये. 

शोध काहीही सांगोत पण दैनंदिन जीवनात आपण पाहत असतो की, काही खास कामे पुरुष चांगल्याप्रकारे करु शकतात तर काही कामे स्त्रिया अधिक चांगल्याप्रकारे करु शकतात. एक्सपर्ट्सही हे सांगतात की, पुरुषांमध्ये शिकण्याची आणि समजण्याची क्षमता तर असतेच पण ते एकावेळी एकच काम चांगलं करु शकतात. तर स्त्रियांची स्मरणशक्ती, सामाजिक स्किल्स आणि संवाद क्षमता अधिक चांगली असते. 

मेंदूवर इतका जोर का?

महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकारचे शोध होत राहतात. कधी एका शोधातून एका निष्कर्ष निघतो तर दुसऱ्या शोधातून आधीच्या निष्कर्षला नाकारलं जातं. प्रश्न हाही आहे की, काही लोक किंवा खास वर्गातील समूहावर झालेल्या या शोधांना काय प्रत्येक समाजावर लागू केलं जाऊ शकतं? शोधात सहभागी लोकांची सामाजिक, भौगोलिक, मानकिस आणि भावनात्मक संरचना वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे संबंधाच्या स्तरावर स्त्री-पुरुषांच्या या वेगळेपणाला मेंदूच्या मर्यादेतच का शोधलं जावं? याने कुणाला फरक तरी काय पडतो? 

हृदयाची चावी मेंदूत

तज्ज्ञ सांगतात की, संबंधाची इच्छा ही व्यक्तीच्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर निर्भर करते. शिक्षण, जबाबदारी, आरोग्य, संबंध आणि आर्थिक स्थितीचाही संबंधांवर गंभीर प्रभाव होतो. आर्थिक रुपाने चांगलं असणे, शिक्षित असणे, जीवनाने संतुष्ट स्त्रीचं लैंगिक जीवनही चांगलं राहतं. याचं कारण हे की, त्या संबंधांमध्ये आपलं म्हणनं, पसंत-नापसंत, इच्छा आणि अपेक्षां व्यक्त करण्याची क्षमता ठेवतात. पण हे असताना मेंदूच्या भूमिकेकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही. कारण तो एकप्रकारे चावीसारखं काम करतो, ज्याने हृदयाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. मेंदू विचार करेल, कल्पना करेल तेव्हाच त्यांना खास अॅक्टिविटी प्रति इच्छा होईल.   

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टWomenमहिला