शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांच्या पाठी धावण्याची मनमुक्त मौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:41 IST

त्यासाठी आधी उतरुन ठेवा मुलांच्या पाठीवरचं ओझं आणि पकडा त्यांचं बोट..

ठळक मुद्देआपल्या मुलांची स्वप्नं वेगळी असू शकतात. आपल्या स्वप्नांचं त्यांच्या पाठीवर असलेलं ओझं उतरवा.मुलांच्या स्वप्नांना नवे रंगीत पंख फुटतील.. उडा त्यांच्या बरोबर तुम्हीही.

- मयूर पठाडेआपण स्वत:ला कोणात पाहात असतो?.. खरंच सांगा, आपल्या मुलांमध्येच आपण स्वत:ला पाहतो की नाही? जे आपल्याला जमलं नाही, ज्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण जीवाचं रान केलं, पण नाहीच जमलं शेवटी ते.. ते सारं आपल्या मुलानं पूर्ण करावं असं आपल्याला वाटतं की नाही? त्याचसाठी तर असतो आपला सारा अट्टहास.. त्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असते.. पण असं का?..जी स्वप्नं तुम्ही पाहिली, ती तुमची होती. स्वत:ची. खास. पण अशीच स्वप्नं तुमच्या मुलांचीही असू शकतात. तुमच्यापेक्षा वेगळी. त्यांचा ध्यास वेगळा असेल, त्यांची आवड वेगळी असेल आणि त्यापाठी धावण्याचा त्यांचा वेग, आवाका आणि जिद्दही वेगळी असेल.. असू शकते..स्वप्नांच्या पाठी धावताना ही गोष्टही नक्की लक्षात ठेवा.. जे तुमचं स्वप्नं आहे, होतं, तेच जर मुलांचंही असेल, तर उत्तमच, पण मुलांची स्वप्नं जर तुमच्यापेक्षा वेगळी असतील, तर त्यांचं आकाशही वेगळं असेल. उडू द्या त्यांना त्यांच्या आकाशात. त्यांना फक्त मदत करा. उडतील ते त्यांचे स्वत:च. उडण्याच्या या प्रयत्नात कधीतरी ते पडतील, ठेचकाळतील, कधी रक्तही येईल, पण द्या साथ त्यांच्या स्वप्नांना. जमलंच तर मुलांचंच बोट पकडून त्यांच्याबरोबर उडायला शिका.पण बºयाचदा काय दिसतं? आपल्या भूतकालीन स्वप्नांना दुसºयांचे पंख लावून उडण्याच्या प्रयत्नात आपण मुलांचेच पंख कापायला जातो.. आपल्याही नकळत आपल्या स्वप्नांचा बोजा त्यांच्या खांद्यावर टाकून उडण्यापूर्वीच आपण मुलांना खाली बसवतो. एवढा बोजा घेऊन कशी उडतील ती?..आपण आपल्या स्वप्नांसाठी जगलो, पण मुलांची स्वप्नं काय आहेत, कुठल्या आकाशात त्यांना झेप घ्यायचीय आणि कुठल्या विश्वात जायचंय, याची साधी दखल तरी घेतो आपण?मुलांच्या पाठीवर ठेवलेलं आपल्या स्वप्नांचं ओझं उतरवा आणि मग बघा.. त्यांच्या स्वप्नांना नवे रंगीत पंख फुटतील.. ते स्वत: तर त्यासोबत उडतीलच, पण तुम्हालाही अवकाशात मुक्त भरारी घेतल्याचा आनंद मिळेल..