सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक वाढल्यामुळे रिलेशनशिपमध्ये असताना धोका देण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे. पार्टनरमध्ये कोणती लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही ब्रेकअप लगेचचं करायला हवं याबाबत आम्ही  सांगणार आहोत. कारण अनेकदा आपल्या बॉयफ्रेंडच्या काही गोष्टी खटकत असताना  सुद्धा निव्वळ नातं तुटू नये म्हणून आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. पण याच गोष्टी तुम्हाला महागात पडू शकतात. तुम्हाला कल्पना नसतानाही पार्टनर तुम्हाला सोडून  जाऊ शकतो. मुव्हिमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या पार्टनरच्या सुद्धा इतर मुलींसोबत संबंध असू शकतात.

जास्त पजेसिव्ह असणं

जर तुमच्या पार्टनरला तुमचे मेल फ्रेंड्स आवडत नसतील किंवा तुमचं त्यांच्यासोबत येणं, जाणं त्यांना आवडत नसेल. त्यामुळेच तुमचा बॉयफ्रेंड सतत संशय घेत असेल तर त्याच जास्त पजेसिव्ह असणं तुमच्या नैराश्यांचं कारण ठरू शकतं. म्हणून शक्य होईल तितक्या लवकर अशा मुलांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. 

सतत भम्र होणं

हा एकाप्रकारचा आजार आहे. ज्यात व्यक्तीला वेगवेगळे भ्रम होतात. तुमच्या पार्टनरला तुम्ही त्याला धोका देणार आहात किंवा सतत खोटं बोलत आहात असं वाटत असेल तर ते योग्य नाही. कारण नातं हे विश्वासाच्या बळावर टिकून असतं.  तुम्ही इतरांशी त्याच्याबद्दल गॉसिप करता असं वाटत असेल, तुमच्यावर पार्टनर सतत नजर ठेवून असेल किंवा सगळ्याच गोष्टीत रोख,ठोक लावत असेल तर यामुळे तुम्ही निराश होऊन डिप्रेशनमध्ये येऊ शकता. म्हणून शक्यतो अशा मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये राहू नका. 

सतत निर्णय बदलणं

तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन केला असेल सगळं ठरवल्यानंतर तुमच्या बॉयफ्रेंड्ने प्लॅन कॅन्सल केला  तर यापेक्षा वाईट कोणत्याच गोष्टींच वाटत नाही. एखाद्यावेळी ठिक आहे. पण हेच जर सतत होत असेलतर तुम्हाला नंतर त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून विचार करून योग्य निर्णय घ्या. 

स्वतःपुढे कोणाचंही चालू न  देणे

मनोरूग्ण आत्मकेंद्रित असतात.  त्यांच्यामुळे बाकिच्या लोकांना त्रास होत आहे. याची त्यांना जराही कल्पना नसते.  त्यामुळे लोकांना रिलेशनशिपमध्ये असताना असे लोक स्वतःच्या मनाप्रमाणे पार्टनरवर हक्क दाखवतात. त्यांच्या मनाविरूध्द काहीही होऊ देत नाही. म्हणून  तुमचा बॉयफ्रेंड असं वागत असेल. जास्तवेळ रिलेशनशिपमध्ये राहणं तुमच्या मनावर परिणाम करू शकतं.

Web Title: How to identify when your boyfriend is going to cheat you myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.