शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

लग जा गले ! पार्टनरच्या Hug करण्याच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचं रिलेशन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 19:32 IST

प्रेम शब्दांच्या पलिकडले असेल आणि मन की बात व्यक्त करण्याची हिंमत होत नसेल, तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी 'जादू की झप्पी'चा आधार घ्या, म्हणजेच मिठीचा.

'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', आपल्या भावना आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जण मंगेश पाडगावकर यांच्या या कवितेचा आधार कधी ना कधी तरी घेतो. प्रेम शब्दांत व्यक्त करायचं म्हटलं की आपसूकच ही कविता प्रत्येकाच्या डोक्यात येतेच. पण भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नेहमी महत्त्वाची भूमिका बजावतात का?, तर असा काही नियम नाही. हावभाव, वागणं, पाहणं, इशारे आणि विशेष म्हणजे स्पर्शद्वारेही अव्यक्त प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. 

प्रेम शब्दांच्या पलिकडले असेल आणि मन की बात व्यक्त करण्याची हिंमत होत नसेल, तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी 'जादू की झप्पी'चा आधार घ्या, म्हणजेच मिठीचा. मिठी मारणं हे प्रेम व्यक्त करण्याची एक निराळीच पद्धत आहे. मिठी मारण्याची एकच पद्धत असल्याचे अनेकांचं म्हणणं आहे. पण खरंतर तसं नाहीय. मिठी मारण्याच्या पद्धतींमध्येही प्रचंड फरक आहे. चला तर मग जाणून घेऊया Hug करण्याच्या पद्धती आणि मिठीच्या पद्धतीवरुन ओळखा तुमचे रिलेशनशिप 

1. घट्ट मिठी मारणे :जर तुमचा पार्टनर घट्ट मिठी मारत असेल तर त्याला तुमच्यापासून दूर जाण्याची अजिबात इच्छा नाहीय. नात्यात दुरावा येऊ नये, अशी त्याची कायम भावना असते. शिवाय, पार्टनर तुमच्यासोबत वेळ घालवण्यास आवडते. घट्ट मिठी म्हणजे रोमँटिक असणे असे नाही तर तुम्ही  एकमेकांच्या प्रचंड जवळ आहात, हे दिसून येते.

2. बिअर हग :बिअर हग म्हणजे तुमच्यात आणि पार्टनरमध्ये मुंगी शिरण्यासाठीही जागा नसते, इतके तुम्ही एकमेकांच्या जवळ असता. यावरुन दोघांमध्ये किती प्रेम आहे, दोघांना एकमेकांची किती काळजी आहे, ही भावनादेखील दिसते.

3. खांद्यावर डोके ठेवून मिठी मारणं :या मिठीला स्लीपि हग असंही म्हणतात. यामध्ये तुम्ही पार्टनरच्या खांद्यावर डोके ठेऊन त्याला/तिला हग करता. याचा अर्थ तुम्ही आपल्या पार्टनरसोबत खूप कम्फर्टेबल फील करता. त्याच्यासोबत राहिल्यास तुम्हाला कशाचीही काळजी वाटत नाही. तुमच्या मिठीत पार्टनरला अतिशय सुरक्षित वाटते. 

4. डेडलॉक हग :तुमचा पार्टनर तुम्हाला पाहून खूप झाल्यावर अशा पद्धतीनं हग करतो. तुमच्यापासून दुरावण्याचीही त्याला भीती सतावत असावी. त्यामुळे यासंदर्भात बोलून नात्यात दुरावा निर्माण होणार नाही, याबाबत त्याला भरवसा द्यावा.

5. अर्धवट मिठी मारणे : जर तुमचा पार्टनर तुम्हाला पूर्ण मिठी न मारता अर्धवटच हग करत असेल तर तुम्हाला त्याच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. कदाचित त्याला/तिला आता तुमच्यात काहीही इंटरेस्ट नसण्याची शक्यता असू शकते.

6. पॅशनेट हग : जेव्हा एखादी व्यक्ती खूपच जवळ असते, तेव्हा ती पॅशनेट हग  करते. जर तुमचा पार्टनर तुम्हाला पॅशनेट हग करत असेल तो/ती प्रचंड रोमँटिक आहे आणि तुमच्यासोबत त्याचे/तिचे इमोशनल नाते आहे. 

7. दीर्घकाळ मिठीत असणे (लॉन्ग होल्ड हग):पार्टनरनं मिठी मारल्यानंतर दीर्घकाळापर्यंत तुम्हाला पकडूनच ठेवले असेल तर त्याला तुमची फारच गरज आहे, हे समजून घ्या. पार्टनर कोणत्या गोष्टीमुळे तणावात आहे?, काळजीत आहे?, हे त्याला /तिला विचारा. त्याच्या/तिच्यासोबत बसून समस्या जाणून घेतल्यास त्यांना खूप हलकं वाटेल. शिवाय, प्रत्येक प्रोब्लेम्समध्ये तुम्ही त्यांच्यासोबत असता हे समजल्यानंतर त्यांना होणाऱ्या आनंदाची तुलना कशाचीही केली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न