(Image Credit : forbes.com)

कोरोना व्हायरसच्या महामारीचा प्रभाव संपल्यावर हात मिळवणे आणि गळाभेट घेणे ही शिष्टाचाराची संस्कृती जवळपास पूर्णपणे बंद होईल. असा आमचा नाही तर वैज्ञानिकांनी दावा केला आहे. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी शारीरिक संपर्कावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे काही वेळातच लोकांच्या सामाजिक व्यवहाराच्या पद्धतींमध्ये बदल बघायला मिळतील.

या महामारीबाबत मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या जागरूकतेमुळे कोविड-19 च्या जाळ्यात अडकलेली ही पिढी मित्र आणि परिवारातील लोकांशी शारीरिक संपर्काने अभिवादन करण्याबाबत नेहमी घाबरलेली राहील.

हाताचा कोपरा नवा ट्रेन्ड

(Image Credit : theatlantic.com)

तज्ज्ञांचं असं मत आहे की, हात मिळवण्याचा शिष्टाचार हाताचं कोपर लावण्यात बदलेल. त्यासोबतच बिझनेस मीटिंग्स आणि कॉन्फरन्समध्ये वाकून मान हलवण्याची परंपरा सुरू होईल. तसेत तज्ज्ञांनी असंही मत व्यक्त केलं की,  आता लोकांना सरफेस स्वच्छ ठेवणे याची सवय लागेल आणि सॅनिटायजरची विक्रीही नेहमीसाठी वाढेल.

(Image Credit : deccanherald.com)

वैज्ञानिकांनी ठामपणे सांगितले आहे की, यूकेमध्ये कमीत कमी सहा महिने सोशल डिस्टंसिंग कायम ठेवलं जाऊ शकतं. आता ही पावले अशीच जास्त वेळ उचलली गेली तर लोकांना या गोष्टींची सवय लागेल. नंतर या सवयी बदलणंही त्यांना अवघड होईल.

नॉटिंगघम ट्रेंट यूनिव्हर्सिटीचे संशोधक रॉबर्ट डिंगवॉल म्हणाले की, मला वाटतं की, फार जास्त काळापर्यंत आता आपण आपले होत पुन्हा पुन्हा धुवत राहणार आहोत. पण तीन फूट दूर राहण्याची सवय आपल्याला लागेल असं मला वाटत नाही.

(Image Credit : aljazeera.com)

याआधी मीटू अभियानामुळे दोन व्यक्तींमधील शारीरिक अंतर काही प्रमाणात वाढलं आहे. आपण एकमेकांपासून सहा फूट दूर तर राहणार नाही, पण एकमेंकांची गळाभेट घेणं नक्कीच बंद होईल. 


Web Title: Coronavirus scare ditch hanshake and hug api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.