शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले

By admin | Updated: October 2, 2014 00:28 IST

महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी

रत्नागिरी : महावितरणच्या ३३/११ केव्ही रहाटाघर उपकेंद्राचे काम पावसामुळे रखडले आहे. उपकेंद्र परिसरात पाणी साठल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. भूमिगत वाहिनीचे कामकाज पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे उपकेंद्र सुरू होण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रहाटाघर उपकेंद्र सुमारे पाच कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येत आहे. या उपकेंद्राची क्षमता १० मेगावॅट आहे. या ठिकाणी ५ मेगावॅटचे दोन ट्रान्स्फार्मर उभारण्यात येणार आहेत. ३३/११ केव्ही हार्बर उपकेंद्र व ३३/११ केव्ही कुवारबाव केंद्रांना हे उपकेंद्र जोडण्यात येणार आहे. शिवाय ३३/११ केव्ही पावस येथून येणारी भूमिगत वाहिनी या उपकेंद्राला जोडली जाणार आहे. कुवारबाव किंवा हार्बर वाहिनी बंद पडल्यास पावस वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे. या उपकेंद्रामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. भूमिगत वीज वाहिनी शहरात आणण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणने ३५ लाख रूपये नगरपालिकेकडे जमा केले आहेत. कोस्टल विभागातील भूमिगत वीजवाहिनीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर, गणपतीपुळे, गुहागर व मालवण येथे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. फयान किंवा अन्य वादळ झाल्यास ओव्हरहेड वायर तुटण्याची भीती असते. पावसाळ्यात भूमिगत वाहिन्यांचे काम करता येत नाही. त्यामुळे संबंधित काम थांबविण्यात आले होते. डिसेंबरपर्यंत उपकेंद्र होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता एस. पी. नागटिळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)