शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे काम कौतुकास्पद

By admin | Updated: December 12, 2015 00:19 IST

संजय शिंदे : जयराम केसरकर यांना समाजसेवी पुरस्कार; संस्थानच्या रूग्णवाहिका चालकाचा सत्कार

देवरूख : राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी करत असलेले काम सर्वच संस्था, संघ यांना मार्गदर्शक असून हे आदर्शवत काम देवरुखला नवीन ओळख व नाव मिळवून देईल, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी देवरूख येथे राजू काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीच्या सातव्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले. अ‍ॅकॅडमीतर्फे दिला जाणारा यंदाचा समाजसेवी पुरस्कार जयराम सखाराम ऊर्फ दादा केसरकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच गेली ५० वर्षे साप व सर्पदंशावर अचूक उपचार करणारे व शेकडो जणांचे प्राण वाचवणारे सोनारवाडी येथील तुकाराम कांबळे यांचा अ‍ॅकॅडमीतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. अ‍ॅकॅडमीच्या शिस्तबद्ध व आगळ्या वेगळ्या कामाचा बळीराम सावंत, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, सदानंद भागवत यांनी विशेष उल्लेख केला.चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या सहकार्याने भाऊ वाघधरे यांच्या माध्यमातून तब्बल १६ जणांनी यावेळी देहदानाचे अर्ज भरुन एक वेगळाच विक्रम केला व राजू काकडेला श्रद्धांजली वाहिली.यावेळी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेचे चालक प्रसाद सप्रे यांचा सत्कार करण्यात आला. महामार्गावरील अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू व्हावेत, यासाठी संस्थानतर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. यावेळी संस्थानच्या रुग्णवाहिका सेवा विभागाचे प्रमुख राजन बोडेकर, श्रद्धा बोडेकर आदींची उपस्थित होती. त्यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. (प्रतिनिधी)