किरकाेळ कारणातून महिलेवर सुरीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST2021-05-09T04:33:16+5:302021-05-09T04:33:16+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-कांबळेलावगण येथे एकाने किरकोळ कारणातून महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की करत तिच्या पाठीत सुरीने वार केले. ही ...

The woman was stabbed for minor reasons | किरकाेळ कारणातून महिलेवर सुरीने वार

किरकाेळ कारणातून महिलेवर सुरीने वार

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-कांबळेलावगण येथे एकाने किरकोळ कारणातून महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की करत तिच्या पाठीत सुरीने वार केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेचा सुमारास घडली. याप्रकरणी सचिन सदाशिव धातकर (३५, रा. वाटद-कांबळेलावगण फाटा, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्याविरोधात दीक्षिता दिलीप धातकर (४६, रा. वाटद-कांबळेलावगण फाटा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित सचिन धातकर आणि दीक्षिता धातकर यांनी एकत्रित जागा घेऊन त्यात चाळ टाइप घर बांधून ते वेगवेगळे राहतात. त्यांच्यात नेहमी वादही होत असतात. काही दिवसांपूर्वी खंडाळा दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या घरी येऊन सचिन कुठे राहतो, असे विचारले. तेव्हा दीक्षिताने पोलिसांना सचिनचे घर दाखवले होते. या रागातून शुक्रवारी सचिनने दीक्षिताला शिवीगाळ व धक्काबुक्की केली, तसेच तिच्या पाठीत सुरीने वार करत तिला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: The woman was stabbed for minor reasons