अनधिकृत धंद्यावर कारवाईचे धाडस पोलीस दाखवणार का : अभिजित गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST2021-08-27T04:34:28+5:302021-08-27T04:34:28+5:30

राजापूर : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाईची तत्परता दाखविणारे पोलीस अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का?, असा ...

Will the police show courage to take action against unauthorized business: Abhijit Gurav | अनधिकृत धंद्यावर कारवाईचे धाडस पोलीस दाखवणार का : अभिजित गुरव

अनधिकृत धंद्यावर कारवाईचे धाडस पोलीस दाखवणार का : अभिजित गुरव

राजापूर : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाईची तत्परता दाखविणारे पोलीस अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का?, असा प्रश्न भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला. राजापूर शहरात एस. टी. डेपो परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेचा राजापूर भाजपतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. मात्र, पोलीस राजकीय दबावापोटी अशा कारवाया करत असून, याला आम्ही घाबरत नाही, असेही गुरव यांनी म्हटले आहे. राजापूर शहरात एस. टी. डेपो परिसरातही अवैध धंदे सुरू आहेत. यापूर्वी याविरोधात आपण तक्रार केली होती. मात्र, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या अवैध धंद्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?, असा प्रश्न गुरव यांनी उपस्थित केला आहे. नियम आणि कायदे सगळ्यांसाठी सारखे असतील, तर मग अनधिकृत व्यावसायिकांची पाठराखण कशासाठी, असेही त्यांनी विचारले आहे.

Web Title: Will the police show courage to take action against unauthorized business: Abhijit Gurav