शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चोहोबाजूंनी निळेशार पाणी, गावात ये-जा करायला रस्ताच नाही; रत्नागिरीतील जुवेवासियांची अनेक वर्षांची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 13:06 IST

या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर येथे कैद केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या महाराणी ताराराणींना याच जुवे बेटावर सुरक्षित ठेवण्यात आले होते.

विनोद पवारराजापूर : गावाच्या चारही बाजूंनी निळेशार पाणी, गावात १११ घरे आणि लोकसंख्या मात्र फक्त ७८. गावात राहायला कोणी तयारच नाहीत. कारण गावात ये-जा करायला रस्ताच नाही. कोणी आजारी पडले तर रुग्णवाहिका गावापर्यंत येऊ शकत नाही. त्यामुळे कुणी रस्ता देईल का रस्ता, असे म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.गेली अनेक वर्षे जुवे गावाची ही समस्या कायम आहे. त्याबाबत सर्व यंत्रणांचे दरवाजे वाजवूनही दखल घेतली गेलेली नाही. २००९ साली या बेटापासून देवाचे गोठणे गावापर्यंत खारभूमी खात्याने बंधारा बांधला. त्यावरून ये-जा सुरू झाली. मात्र, हे सुख ग्रामस्थांच्या नशिबात अल्पकाळच टिकले. देवाचे गोठणे येथे बंधाऱ्याला जोडणारा मार्ग खासगी जागेतून जात असल्याने तो बंद करण्यात आला आहे.२००९ साली बंधारासाधारण १९६९ साली या गावाला शासनाने ग्रामपंचायत मंजूर केली. दरवर्षी निवडणूक बिनविरोध करून या गावाने शासनाचे लाखो रुपये वाचवले आहेत. मात्र, शासन अद्यापही या गावाला सापत्न वागणूक देत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. २००९ साली  खारभूमी विकास मंडळ, उपविभाग लांजा यांच्यामार्फत जुवे (जैतापूर) बेट ते देवाचे गोठणे (राघव वाडी) असा ९००  मीटर लांबीचा बंधारा पूर्ण झाला.रस्त्याचे सुख अल्पकाळसर्व प्रकारची वाहतूक (दळणवळण) होण्यासाठी या बंधाऱ्याच्या जुवे बेटावरील ग्रामस्थांना उपयोग होऊ लागला. मात्र, देवाचे गोठणे (राघव वाडी) हद्दीतील जुवे  बंधाऱ्यापर्यंत येणारा रस्ता वैयक्तिक मालकी हक्काच्या जागेतून येत असल्याने तो २०११ सालापासून बंद करण्यात आला, असे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर मधला  काही काळ रस्ता चालू होता. मात्र, गेली काही वर्षे तो पुन्हा बंद झाला आहे.निम्मी घरे बंदच...राजापूर तालुक्यातील जैतापूरच्या खाडीत वसलेले हे जुवे जैतापूर बेट. स्वतंत्र ग्रामपंचायत असणारे. गावाची लोकसंख्या फक्त ७८! जवळपास ४५ हेक्टर क्षेत्रावर वसलेल्या या बेटावर घरे मात्र १११. त्यातील निम्म्याहून अधिक घरे बंदच आहेत. कारण गावात यायला रस्ता नाही!राजापूरच्या गढीचे संरक्षणया गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर येथे कैद केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या महाराणी ताराराणींना याच जुवे बेटावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली असणारे हे जुवे बेट एकेकाळी राजापूर खाडीत येणाऱ्या परकीयांच्या आक्रमणांवर नजर ठेवून असायचे. राजापूरच्या गढीचे संरक्षण करायचे! पण आता या बेटाचे संरक्षण कोणी करायचे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. होडीच ठरते तारणहार

  • सध्या या गावाचे सर्व व्यवहार व प्रवास हा फक्त होडी वाहतुकीवरच अवलंबून आहे. बाराही महिने अगदी रेशनपासून ते डॉक्टरपर्यंत सर्व सेवांसाठी फक्त होडीतूनच प्रवास करावा लागत आहे.
  • गावात चौथीपर्यंतची शाळा असली तरी पुढील शिक्षणासाठी होडीने जैतापूर गाठावे लागत आहे. अनेक वर्षे येथील ग्रामस्थ तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे देवाचे गोठणे गावातून जुवे बंधाऱ्यापर्यंत येणाऱ्या रस्त्याची मागणी करत आहेत. मात्र, अजूनही त्याला मूर्त स्वरूप नाही.

 

गेली अनेक वर्षे आम्ही शासनाकडे देवाचे गोठणे येथून जुवे खारलँड बंधाऱ्यापर्यंतच्या रस्त्याची मागणी करत आहोत. या रस्त्यासाठी वेळोवेळी शासन पातळीवर निवेदने दिलेली आहेत. मात्र, शासन या मागणीकडे कानाडोळा करत आहे. परिणामी आम्हाला अनेक वर्षे नरकयातनाच भोगाव्या लागत आहेत. शासनाने आता तरी आमच्या या रस्त्याच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करावा. नाही तर काही वर्षातच जुवे गाव निर्मनुष्य होऊन जगाच्या नकाशावरून नष्ट होईल. - अनिल करंजे,  जुवे ग्रामस्थ

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी