शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला मारहाण

By admin | Updated: July 13, 2015 00:32 IST

संगमेश्वर रुग्णालय : डॉक्टरविरुध्द शिवसेना कार्यकर्त्यांची धडक

देवरूख : प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झालेल्या महिलेलाच रूग्णालयातील डॉक्टरने मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात शनिवारी घडला. या उद्दाम डॉक्टरची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी संगमेश्वरवासीयांमधून होत आहे. लवकरात लवकर या डॉक्टरची उचलबांगडी न झाल्यास सेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे - गुरववाडी येथील महिला प्रसुतीसाठी कळंबस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल झाली. येथील आशा समीना जावेद काझी यांच्यामार्फत त्या संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली. या महिलेची तपासणी करण्यासाठी डॉ. संजय दिनकर वारे सरसावले. या महिलेला प्रसुतीच्या वेदना असह्य झाल्याने पाय झाडत असताना डॉ. वारे यांना लागला. महिलेने पाय चुकून लागल्याचे असल्याचे सांगितले.मात्र, वेदनेने विव्हळत असलेल्या महिलेने आपल्याला मुद्दाम लाथ मारल्याची ओरड डॉ. वारे यांनी सुरू केली. यानंतर डॉ. वारे यांनी या महिलेच्या पायावर फटके लगावले. यावरच न थांबता डॉ. वारे यांनी अर्वाच्च भाषेत संभाषण करत ‘जर तू लवकर प्रसूत झाली नाहीस, तर छत्रीने मारीन’, अशी धमकी दिली. घडलेला प्रकार महिलेने नातेवाईकांच्या कानावर घातला. याची माहिती शिवसैनिकांना मिळताच माजी सभापती सुजित महाडिक, प्रकाश घाणेकर, अनिल बोले, चंद्र्रकांत बाईत, कृष्णा मालप, फय्याज दळवी, सत्यवान विचारे यांनी त्वरित रूग्णालयात धाव घेतली. त्यांनी डॉ. वारे यांना धारेवर धरले.तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या आक्रमकपणापुढे डॉ. वारे यांनी नमते घेत आपल्याकडून चुकून असा प्रकार झाल्याची कबुली दिली. यापुढे असा प्रकार होणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच महिलेची माफी मागितली. या संतापजनक प्रकाराबाबत संगमेश्वरवासीयांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. वारे यांच्या बाबतीत वारंवार तक्रारी पुढे येत आहेत, आज तर त्यांनी कहरच केला. त्यामुळे डॉ. वारे यांची लवकरात लवकर उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही लवकरच जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. उचलबांगडी न झाल्यास वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच पेटणार, असे दिसत आहे. (प्रतिनिधी)