खापणे महाविद्यालयात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:49+5:302021-07-02T04:21:49+5:30

पाचल : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ...

Various activities in eating college | खापणे महाविद्यालयात विविध उपक्रम

खापणे महाविद्यालयात विविध उपक्रम

पाचल : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शाहू महाराजांचे जीवन व कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत जावे, या उद्देशाने महाविद्यालयाचा ‘आयक्यूएसी’ विभाग व ‘मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ विभागाने शाहू महाराजांचे जीवन व कार्य या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय प्रश्नमंजुषा आयोजित केली होती.

यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील ४७० स्पर्धक सहभागी झाले होते. ऑनलाईन प्रश्नमंजुषा यशस्वीपणे सोडविणाऱ्या ४७० स्पर्धकांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्राचार्य डॉ. प्रमोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आयक्यूएसी’ विभागप्रमुख प्रा. संजय निंबाळकर, मराठी भाषा व वाङ्मय मंडळ प्रमुख डॉ. विकास पाटील, डॉ. बळवंत दाभाडे, आदींनी केले होते.

Web Title: Various activities in eating college