शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

उमेश शेट्येंकडून पालिकेची फसवणूक : कीर

By admin | Updated: October 30, 2015 23:11 IST

दलबदलूंना धडा शिकवा : माने

रत्नागिरी : खोटे-नाटे प्रकार करून, खोटे दस्तऐवज बनवून उमेश शेट्ये यांनी पालिकेचीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कृष्णा रेसिडेन्सी या केतन शेट्ये या मुलाच्या नावावर असलेल्या पालिका क्षेत्रातील १३०३ क्रमांकाच्या इमारत पूर्णत्त्वाचा खोटा दाखला जोडून उमेश शेट्ये यांनी पालिकेची फसवणूक केली आहे. त्यासाठी दिलेला जावक क्रमांक हा पालिकेने वेगळ्याच संस्थेला दिल्याची कागदपत्र निष्पन्न झाली असून, पालिकेची व लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केल्याची माहिती नगरसेवक मिलिंद कीर यांनी पत्रकारपरिषदेत दिली. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील तेली आळीमधील कृष्णा रेसिडेन्सी या १३०३ क्रमांकाच्या अपार्टमेंट पूर्णत्त्वाचा दाखला रत्नागिरी नगरपरिषदेच्या जावक नोंदणी रजिस्टरमधील जा. क्र. १९८२ /३०/६/२०१० या तारखेने दिलेला आहे, असे विकासकाने खरेदी - विक्री व्यवहारांमध्ये जोडलेल्या दाखल्यात नमूद केले आहे. मात्र, जावक रजिस्टरची सत्यप्रत पाहिल्यानंतर जावक रजिस्टरला १९८२ /३०/६/२०१० या तारखेने व जावक क्रमांकाने कृष्णा रेसिडेन्सीला इमारत पूर्णत्त्वाचा कोणताही दाखला दिलेला नाही. तर या नंबरने सहाय्यक संशोधन अधिकारी, दक्षता व जल नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रयोगशाळा अशी नोंद जावक रजिस्टरमध्ये आहे. त्यामुळे शेट्ये यांनी त्यांच्या मुलाच्या इमारतीच्या पूर्णत्त्वाचा दाखला बनावटरित्या तयार करून घेतला व पालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती मिलिंद कीर यांनी दिली. (प्रतिनिधी)दलबदलूंना धडा शिकवा : मानेरत्नागिरी : आमदार उदय सामंत व उमेश शेट्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यात मिलिभगत आहे. त्यामुळे रत्नागिरीकरानी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशा बेईमान, पक्षबदलूंना जनतेनेच धडा शिकवावा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार, प्रदेश प्रवक्ते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केले. रत्नागिरीत चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचाराला रत्नागिरीत दाखल झाले आहेत. मात्र, भाजप उमेदवारांचे प्रचार अत्यंत शांतपणे सुरू आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज माने यांनी भाजपची भूमिकाही स्पष्टपणे जनतेसमोर मांडली. ते म्हणाले, आमदार सामंत हे जसे पक्षबदलू आहेत, गद्दारीचे शिलेदार आहेत तसेच उमेश शेट्येही पक्षबदलू आहेत. आज दोन वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून जनतेसमोर मतांचा जोगवा मागत आहेत. स्वत:च्या पक्षाशी गद्दारी करणारे जनतेचा केव्हाही विश्वासघात करू शकतील. त्यामुळे या गद्दारी करणाऱ्यांच्या आश्वासनांना दूर सारून रत्नागिरीकरांनी भाजपच्या चारही उमेदवारांना विजयी करावे, असे माने म्हणाले. उमेश शेट्ये हे प्रचार करताना एक मत मला एक शिवसेनेला असे सांगत सुटले आहेत. त्यामुळे भाजपचे प्रामाणिक उमेदवार विरुध्द अप्रामाणिक कार्यकर्ते यांच्यातील ही लढाई आहे. रत्नागिरीसारख्या नररत्नांची खाण असलेल्या व चांगला वारसा असलेल्या प्रदेशाला पक्षबदलूपणाचा वारसा देऊन बदनाम करणाऱ्या या गद्दारांना रत्नागिरीकरांनी त्यांच्या उमेदवारांना पराभूत करून धडा शिकवावा.(प्रतिनिधी)