मार्गताम्हाणे येथे अज्ञाताने जाळली दोन वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:46 PM2021-04-20T16:46:56+5:302021-04-20T16:48:02+5:30

fIRE cHIPLUN RATNAGIRI : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

Two vehicles were set on fire by unknown persons on the way | मार्गताम्हाणे येथे अज्ञाताने जाळली दोन वाहने

मार्गताम्हाणे येथे अज्ञाताने जाळली दोन वाहने

Next
ठळक मुद्देमार्गताम्हाणे येथे अज्ञाताने जाळली दोन वाहनेपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित साळवी यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभी केली होती. मात्र, सोमवारी मध्यरात्री ही वाहने जळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ही वाहने जाळण्यात आल्याचा आरोप अजित साळवी यांनी केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये वाहने जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. ही वाहने रागापोटी कोणी जाळत आहेत का, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. वाहनांना आग नेमकी कशामुळे लागत आहे, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. मात्र, द्वेषामुळे वाहने जाळण्याचे प्रकार घडल्यास कालांतराने त्यातून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनांचा लवकर तपास करून दोषींना ताब्यात घेण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Two vehicles were set on fire by unknown persons on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.