२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:25 IST2026-04-15T15:21:39+5:302026-04-15T15:25:15+5:30

Gurupushyamrut Yoga 2026: २०२६ चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी आहे? जाणून घ्या...

first gurupushyamrut yoga 2026 know about date shubh muhurat importance and recognition in marathi | २०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता

२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता

Gurupushyamrut Yoga 2026: मराठी नववर्ष सुरू झाले आहे. चैत्र  महिना संपून आता वैशाख महिना सुरू होत आहे. मराठी वर्षांत अनेक शुभ योग जुळून येत असतात. काही योग अतिशय पुण्य फलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशेष योग जुळून आले की, त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी अखंड कृपा प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरू शकतात, असे म्हटले जाते. गुरुपुष्यामृत योग हा असाच एक योग आहे. हा योग वारंवार येत नाहीत. २०२६ चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी आहे? जाणून घेऊया...

गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. 

२०२६ गुरुपुष्यामृत योगाचा ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त

यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी गुरुपुष्यामृतयोग रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटांपासून ते पहाटे ०६ वाजून १७ मिनिटांपर्यंत असणार आहे. 

पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ

ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.

गुरुपुष्यामृत योगात विशेष लक्ष्मीपूजन

गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.

 

Web Title : 2026 का पहला गुरुपुष्यामृत योग: शुभ मुहूर्त, महत्व और मान्यताएं

Web Summary : 2026 में पहला गुरुपुष्यामृत योग 23 अप्रैल को है। यह शुभ योग, नए उद्यमों और लक्ष्मी पूजा के लिए आदर्श है, तब होता है जब पुष्य नक्षत्र गुरुवार के साथ संरेखित होता है। इसे धन और सफलता के लिए फायदेमंद माना जाता है, लेकिन इस दौरान विवाह की सलाह नहीं दी जाती है।

Web Title : 2026's First Gurupushyamrut Yoga: Auspicious Time, Significance, and Beliefs Explained

Web Summary : The first Gurupushyamrut Yoga in 2026 falls on April 23rd. This auspicious yoga, ideal for new ventures and Lakshmi worship, occurs when Pushya Nakshatra aligns with Thursday. It is considered beneficial for wealth and success, but marriage is not advised during this time.