शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पोहताना लाटेत वाहत गेले, आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:12 IST

पालघर येथील कुटुंबाच्या आनंदावर विरजण, एकाला वाचविण्यात यश

रत्नागिरी : समुद्रात पाेहत असताना लाटेमध्ये वाहत जाऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे येथे घडली. संताेष शशिकांत भानुशाली (वय ५०, रा.नाईक काॅम्प्लेक्स भाजी मार्केट वाडा, ता. वाडा, जि.पालघर) असे मृताचे नाव आहे, तर याेग राजेश भानुशाली याला वाचवण्यात आले.

याबाबत पूर्णा संताेष भानुशाली (वय २२) यांनी रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे वडील संताेष भानुशाली आणि कुटुंब रविवारी फिरण्यासाठी रत्नागिरी येथे आले हाेते. हे सर्वजण सकाळी ९:३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील आरे-वारे समुद्रकिनारी गेले हाेते. त्या ठिकाणी थाेडा वेळ फिरून त्यांनी फाेटाेही काढले. त्यानंतर, सर्व जण समुद्राच्या पाण्यात पाेहण्यासाठी गेले हाेते. पाण्यात पाेहत असताना संताेष भानुशाली, तसेच मानव, याेग व वरद असे पाण्यात पुढे पुढे पाेहण्यासाठी जात हाेते. 

त्याच वेळी समुद्राची माेठी लाट आली आणि चाैघेही लाटेमध्ये मागे पुढे हाेऊ लागले. यातून मानव आणि वरद हे समुद्राच्या पाण्यातून तत्काळ बाहेर आले. मात्र, संताेष भानुशाली आणि याेग राजेश भानुशाली हे समुद्राच्या लाटेबराेबर वाहत गेले. समुद्राच्या पाण्यात ओढले जाताच त्या ठिकाणी रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तींनी धाव घेतली. त्यांनी दाेघांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी याेग भानुशाली हा शुद्धीवर हाेता, तर संताेष भानुशाली हे बेशुद्धावस्थेत हाेते.

त्यांना खासगी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संताेष भानुशाली यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, तर याेग भानुशाली याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा २०२३ चे कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पाेलिस करत आहेत.

पीसीआर दिला पण...

संताेष भानुशाली यांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्ध पडलेले हाेते. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना पीसीआर दिला. त्यावेळी त्यांचा साधारण श्वास सुरू असल्याचे दिसले. त्यानंतर, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Two Drown in Aare-Ware Sea; One Dead

Web Summary : A tourist drowned and another was rescued at Aare-Ware beach in Ratnagiri after being swept away by a wave. Santosh Bhanushali, 50, was declared dead at the hospital. Police have registered a case of accidental death and are investigating.