शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

त्रिवेणी गमरे हिने रचला जागतिक विक्रम

By admin | Updated: July 1, 2016 23:41 IST

लिम्का बुकमध्ये नोंद : कमी वयात स्केटिंगमध्ये केलेल्या पराक्रमांचे सर्वांकडून कौतुक

खेड : खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या त्रिवेणी चंद्रकांत गमरे हिने कोल्हापूर येथील जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या ‘रिले स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड’ स्पर्धेत जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया यंग अ‍ॅचिव्हर बुक आॅफ रेकॉर्ड, आर. एच. आर. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गमरे हिने या पराक्रमामुळे रोटरी इंग्लिश स्कूलच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. कोल्हापूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५१ तासांचे रिले स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी न थांबता १५१ तास ५१ मिनिटे व ५१ सेकंद हे स्केटिंग करण्याचा अनोखा विक्रम केला. रोटरीची त्रिवेणी गमरे ही रोटरी शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत आहे. या सर्व विद्यार्थ्यांची नोंद विविध रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आली आहे. त्रिवेणीला याबद्दल पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. अत्यंत कमी वयात त्रिवेणी गमरे हिने हा पराक्रम केल्याने सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक विजय निगडेकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, मुख्याध्यापिका प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (प्रतिनिधी)संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे यांनी त्रिवेणी गमरे हिचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.