शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 8:49 AM

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत.

ठळक मुद्देचिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत.मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.

रत्नागिरी -  चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. धरणाजवळचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली असून, परिस्थितीचे अवलोकन केले जात आहे.या धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी शास्त्री नदी आणि वाशिष्ठीच्या खाडीला मिळत असल्याने त्याचा ग्रामस्थांना धोका नसल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या लोकांची नावे

अनंत हरिभाऊ चव्हाण (63)अनिता अनंत चव्हाण (58)रणजित अनंत चव्हाण (15)ऋतुजा अनंत चव्हाण (25)दुर्वा रणजित चव्हाण (1.5)आत्माराम धोंडू चव्हाण (75)लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)नंदाराम महादेव चव्हाण (65)पांडुरंग धोंडू चव्हाण (50)रवींद्र तुकाराम चव्हाण (50)रेश्मा रविंद्र चव्हाण (45)दशरथ रविंद्र चव्हाण (20)वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)अनुसिया सीताराम चव्हाण (70)चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)बळीराम कृष्णा चव्हाण (55)शारदा बळीराम चव्हाण (48)संदेश विश्वास धाडवे (18)सुशील विश्वास धाडवे (48)रणजित काजवे (30)राकेश घाणेकर (30)

पाणी ओव्हरफ्लो झाल्याने जवळच असलेला दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे चिपळूणाचा आकले, रिक्टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला आहे. तिवरे धरण ओसंडून वाहू लागल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 21 जण या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण घटनास्थळी रवाना झाले आहेत.

नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

माजी सभापती  जितेंद्र चव्हाण रामपूर यांची माहीती - दसपटी तिवरे ते पाणी वाशिष्टी नदीला मिळत. त्याठिकाणी  नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि बांधकामचे अधिकारी पोहचलेत, बाधित गावे वालोटी, दळवटने, गाणे ,सती, चिंचघरी, खेर्डी चिपळूण अशी आहेत.

 

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरणDamधरणriverनदीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी