शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वीज पडून तिघे तर विजेच्या धक्क्याने चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 17:49 IST

Rain Ratnagiri : मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून पडू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सोमवारी जिल्ह्यात वीज पडून तिघे जखमी झाले आहेत तर विजेच्या धक्क्याने चार जणांना दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात वीज पडून तिघे तर विजेच्या धक्क्याने चारजण जखमी२४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून पडू लागला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.६९ मिलीमीटर तर एकूण ६०.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, सोमवारी जिल्ह्यात वीज पडून तिघे जखमी झाले आहेत तर विजेच्या धक्क्याने चार जणांना दुखापत झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सोमवारी झालेले नुकसान असे, दापोली तालुक्यात नानटे येथील ३ व्यक्तींना विजेचा झटका लागून किरकोळ जखमी झाले आहेत.

चिपळूण तालुक्यात पेंढांबे येथील मनिषा कदम यांच्या घरावर वीज पडून साक्षी कदम (वय १५), सावरी सुभाष गमरे (वय १५ ), विजय गमरे (वय ३०) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख येथील दीपक आत्माराम शिंदे विजेचा झटका लागून किरकोळ जखमी झाले आहेत. डिंगणी येथे वीज पडल्याने पिठाच्या गिरणीची मोटार व इतर साहित्य जळून खाक झाले असून अंशत: १० हजाराचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी कळविले आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी