शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी झाराप-कुडाळ येथील एल ॲण्ड टी कंपनीच्या गोडाऊनमधून तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी तिघांच्या मुसक्या ...

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी झाराप-कुडाळ येथील एल ॲण्ड टी कंपनीच्या गोडाऊनमधून तांब्याच्या तारेच्या चाेरीप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी दाेघांना रत्नागिरीतील दांडेआडम येथून तर एकाला कुडाळमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या दाेघांना कुडाळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या चाेरीप्रकरणी कंपनीचे विनायक महादेव काेंडेकर (रा. काेल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. काेकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. हे काम एल ॲण्ड टी कंपनीकडे देण्यात आले असून, या कामासाठी वापरण्यात येणारी १५०० किलाे वजनाची सुमारे ८ लाख २५ हजार ६३३ रुपयांची तांब्याची तार चाेरीला गेली हाेती. याप्रकरणी कुडाळ पाेलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी फुरखान सिराजुद्दीन मलिक (२०, रा. उत्तर प्रदेश) आणि सूर्यकांत बसंतकुमार पानी (२८, रा. ओडिसा) या दाेघांना ताब्यात घेतले आहे. झाराप येथून ही तार चाेरून ती रत्नागिरीत आणून ठेवण्यात आली हाेती. याबाबत पाेलिसांना माहिती मिळताच ही तार तेथून मिरजाेळे येथील सुभानंद पाटील यांच्या दांडेआडम येथील फार्म हाऊसच्या परिसरात नकळत ठेवली हाेती. पाेलिसांच्या खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळल्यानंतर पाेलिसांनी तपास सुरू केला. याची माहिती मिळाल्यानंतर त्या जागेवरून ही तार दुसरीकडे नेत असताना ग्रामीण पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडील केबलही जप्त करण्यात आली असून, संशयितांना पुढील तपासासाठी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला कुडाळमधूनच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आणि पोलीस कर्मचारी संतोष कांबळे, वैभव मोरे, संदीप काशीद, विनोद भितळे, अमित कदम यांनी केली.

—————————————

टीप मिळाली अन् चाेरी उघड

तांब्याच्या तारेची चाेरी झाल्याची घटना झाराप येथे घडली असून, तेथेच गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. या चाेरीबाबत अन्य काेणत्याच पाेलीस स्थानकांना माहिती नव्हती. मात्र, रत्नागिरीतील ग्रामीण पाेलिसांना खबऱ्याकडून टीप मिळाली आणि पाेलिसांनी चाेरट्यांच्या मुसक्या आवळल्या. ग्रामीण पाेलिसांनी स्वत:हून या चाेरीचा छडा लावला.