शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

हजारो उमेदवारांना केवळ आठ स्वच्छतागृहे

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

चौकशीची मागणी : ‘महासैन्यभरती’च्या नियोजनातील महाचुका नडल्या

रत्नागिरी : रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ८ फेब्रुवारीपासन सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातून दररोज हजारो उमेदवार येत आहेत. त्यांच्या निवासाची सोय नाहीच, परंतु या हजारो उमेदवारांसाठी क्रीडांगणाच्या बाहेरच्या बाजुला केवळ ८ स्वच्छतागृहे असल्याने उमेदवार व सुविधांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त बनले असून, मारुती मंदिर परिसर कचरा व घाणीमुळे बकाल बनला आहे. या स्थितीला आयोजकांच्या नियोजनातील महाचुुकाच जबाबदार आहेत, असा आरोप आता नागरिकांतून होत आहे. ही सैन्यभरती सैनिक जनरल डयुटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरीता ८ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू झाली असून १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आज सातारा जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया झाली. १६ व १७ फेब्रुवारीला उर्वरित महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील उमेदवारांची भरती होणार आहे. या दोन्ही दिवशी रत्नागिरीत येणाऱ्या उमेदवारांची संख्या आतापर्यंतच्या संख्येहूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील तरुणांची गैरसोय राज्याचाच विषय राहू शकते, परंतु गोवा व गुजरातमधून येणाऱ्या तरुणांची गैरसोय, स्वच्छतागृहे नसणे ही बाब रत्नागिरीची राज्याबाहेर नाचक्की करणारी ठरणार असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. त्यामुळे आयोजक आता सुविधांसाठी केवळ पालिकेकडे बोट दाखवत आहेत. पालिकेनेच घोडचूक केल्याचे भासवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडून चार नवीन स्वच्छतागृहांची व्यवस्थाशहरात सैनिक भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय लक्षात घेऊन रत्नागिरी पालिकेने आज तयार पध्दतीची दोन युनिटस्मध्ये असलेली चार स्वच्छतागृह आज (रविवार) सकाळी शिवाजी स्टेडियमच्या बाहेर बसवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी ‘लोकमत’ला दिली. या खास पध्दतीच्या स्वच्छतागृहांसाठी ५ लाखांचा खर्च आला आहे. मारुती मंदिर परिसर व शहरातच भरती प्रक्रिया संपल्यानंतर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचेही खोडके यांनी सांगितले. सैन्यभरती झाल्यानंतर पालिकेला शहरात स्वच्छता मोहीम राबवावी लागणार आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या उमेदवारांमुळे शहरातील अनेक भागात कचरा साठला असून, त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.