शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

... तर कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST

रत्नागिरी : गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी ...

रत्नागिरी : गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यानी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

सध्या रत्नागिरी शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियमित वाढत असून नागरिकांना संशयित लक्षणे आढळून आल्यास तसेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या सान्निध्यात आल्यास अथवा पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यांतून प्रवास करून आल्यास आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी करणे गरजेचे आहे.

लक्षणे नसलेल्या परंतु करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीस गृहअलगीकरण करण्यात येते. या अलगीकरणाचा कालावधी १७ दिवसांचा आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींनी गृहअलगीकरण केल्यानंतर १७ दिवस घराबाहेर पडू नये. जर संबंधित व्यक्‍ती घराबाहेर फिरताना आढळून आली तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ज्या व्यक्तींना लक्षणे असतील व जे कोरोना रुग्णांच्या सहवासात असतील. परंतु, लक्षणे नसतील अशा व्यक्तींनी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांनी घराबाहेर पडू नये, असेही डॉ. गावडे यांनी सांगितले.

सध्या रत्नागिरी शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्‍तीची मोबाईल टीमद्वारे ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत आहे. वारंवार एखादी व्यक्‍ती जर विनाकारण बाहेर फिरत असेल तर त्या व्यक्‍तीवर गुन्हा दाखल केला जाईल.

कोरोना संशयित व्यक्तींकरिता किंवा चाचणी करावयाच्या असतील तर शिर्केहायस्कूल, माळनाका येथे आरोग्य पथक कार्यरत करण्यात आलेले असून तेथे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे यांनी केले आहे.