शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:46 IST

शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.

ठळक मुद्देदर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल जिल्हा परिषद केंद्रशाळा झरेवाडी, ग्रामस्थ व पालकांचा सहभाग

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमातून इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धा, कार्यानुभवांतर्गत टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती, अभिवाचन कार्यक्रम, बागबगीचा संगोपन, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे, विविध व्यावसायिकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील शाळेत केला जातो.विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शालेय परिसरात भाजीपाला लागवड केली असून, त्याचा वापर पोषण आहारासाठी केला जात आहे. वनभोजन, शैक्षणिक सहलीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.शाळेचे शिक्षक राजेश गोसावी यांनी लेखन, दिग्दर्शन केलेली एकांकिका ह्यसंस्कारह्ण विद्यार्थ्यांनी कणकवली येथे बॅ. नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सादर करून यश संपादन केले. शालेय विद्यार्थिनी सिध्दी गोताड हिला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले आहे. याशिवाय दिव्यांग मुलांच्या मदतीसाठी झालेल्या कला आरोग्य बालनाट्य महोत्सवातही एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.

बाल संस्कार नाट्य अकादमी, पुणे आयोजित बालनाट्य स्पर्धेत अमन गोताड याने प्रथम श्रेणी मिळवली. याशिवाय नेहरू युवा संस्कार केंद्रातर्फे आयोजित वक्तृत्व, चित्रकला, बुध्दिमत्ता, निबंध तसेच समूहगीत स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. प्रत्येक विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांचा भर आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वक्तृत्व स्पर्धा असो वा एकांकिका यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला अधिक बळकटी प्राप्त होत आहे.- अ‍ॅड. अवधूत कळंबटे, पालक

एक विद्यार्थी केंद्रित न करता, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती व्हावी, यासाठी शाळेचे शिक्षक परिश्रम घेत आहेत. शालेय तसेच शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जात आहे, विद्यार्थीही यश मिळवित आहेत.- डॉ. अस्मिता मजगावकर, केंद्रप्रमुख

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी