सुनील भोकरे यांची सांगलीला बदली, बोरसे नवे विभागनियंत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST2021-09-16T04:38:55+5:302021-09-16T04:38:55+5:30

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकपदी कार्यरत असणारे सुनील भोकरे यांची सांगली विभाग नियंत्रक पदावर ...

Sunil Bhokare transferred to Sangli, Borse as new divisional controller | सुनील भोकरे यांची सांगलीला बदली, बोरसे नवे विभागनियंत्रक

सुनील भोकरे यांची सांगलीला बदली, बोरसे नवे विभागनियंत्रक

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकपदी कार्यरत असणारे सुनील भोकरे यांची सांगली विभाग नियंत्रक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथील प्रज्ञेश बोरसे यांची नियुक्ती झाली आहे.

सुनील भोकरे यांनी गेले अडीच वर्षे विभाग नियंत्रक पदाचा उत्तम कारभार सांभाळला होता. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्रमही राबविले होते. कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाची दखल महामंडळाने घेतली. कोरोनाकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद असताना, मालवाहतुकीचा पर्याय त्यांनी जिल्ह्यात यशस्वीपणे राबविला. कोरोनाकाळात आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना एसटीच्या मालवाहतुकीमुळे येथील बागायतदारांची समस्या मार्गी लागला होता.

आता त्यांची बदली सांगली येथे झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी जळगाव येथील प्रज्ञेश बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोरसे हे जळगाव येथे वरिष्ठ आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांची पदोन्नती प्राप्त झाली असून, लवकरच ते विभाग नियंत्रकाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Web Title: Sunil Bhokare transferred to Sangli, Borse as new divisional controller