शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील तरुणींची आत्महत्या प्रेमप्रकरणातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:42 IST

suicide, khed, crimenews, police, ratnagirinews खेड तालुक्यातील आस्तान कातकरीवाडी येथील अल्पवयीन मुलींनी केलेली आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत भारती हिलम हिच्या घरातून मिळालेल्या प्रेमपत्रामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलेले आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेली १२ वर्षीय साक्षी ही भारतीशी असलेल्या घट्ट मैत्रीची बळी ठरली आहे

ठळक मुद्देखेडमधील तरुणींची आत्महत्या प्रेमप्रकरणातूनघरात सापडले प्रेमपत्र, आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह कायम

खेड : तालुक्यातील आस्तान कातकरीवाडी येथील अल्पवयीन मुलींनी केलेली आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत भारती हिलम हिच्या घरातून मिळालेल्या प्रेमपत्रामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलेले आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेली १२ वर्षीय साक्षी ही भारतीशी असलेल्या घट्ट मैत्रीची बळी ठरली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नववीत शिकणारी भारती हिचे तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका मुलावर तिचे प्रेम होते. गेली काही वर्षे ही दोघे लग्नाच्या आणाभाका घेत होते. त्याच्याशी लग्न करून आपला संसार फुलवायचा असे स्वप्न भारती पाहात होती. त्या मुलानेही तिला लग्नाचे वचन दिले होते. याबाबत दोघांच्या घरच्यांना काहीही माहिती नव्हती.दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मोलमजुरीस लागलेल्या त्या मुलाच्या घरच्यांनी मुलगी बघण्यास सुरुवात केली होती. हे भारतीला कळल्याने ती तणावाखाली होती. त्या मुलाच्या घरच्यांनी मांडवे कातकरीवाडी येथील एका मुलीशी लग्न नक्की केले. हे भारतीला कळताच ती ते सहनच करू शकली नाही आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अखेर बुधवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी आई - वडील घरातून बाहेर जाताच तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.दोघींच्या शरीरात विष गेले कसे?दोघांच्या शवाचे विच्छेदन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्यांच्या शरीरात विष गेल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते विष नेमके कुठून आले? दोन्ही मुलींच्या ते एकाचवेळी शरीरात कसे गेले? साक्षीने आत्महत्या का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आम्ही घटनास्थळी पाहणी व पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. मुलींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, त्या मुलींच्या मृत्यूबाबत नातेवाईकांची कोणतीही तक्रार नाही. तरीही शवविच्छेदना तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सारे काही स्पष्ट होईल.- नजीब इनामदार, पोलीस उपनिरीक्षक, खेड

टॅग्स :Suicideआत्महत्याKhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी