शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण डाफळे वाडीतील एका तरुणाने शुक्रवारी सकाळी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण डाफळे वाडीतील एका तरुणाने शुक्रवारी सकाळी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रवीण जयराम डाफळे (वय ३५) असे आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याची फिर्याद सहदेव तुकाराम करंबेळे यांनी दिली आहे. प्रवीण याने घरात कोणी नसताना घराच्या मधल्या खोलीत पायाखाली रिकामी गॅसची सिलेंडर टाकी घेऊन लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता आत्महत्या केली. आत्महत्येचे वृत्त कळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक प्रकाश बाईंग, हेडकॉन्स्टेबल संजय मारळकर, सचिन भुजबळराव, रोहित जाधव, प्रशांत नागवेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे. तर प्रवीण याचे शवविच्छेदन साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. सायंकाळी ६ वाजेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात प्रवीण याचा मृतदेह देण्यात आला. प्रवीण डाफळे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करत आहेत.

चाैकट

मदतीसाठी धावणारा

कासारकोळवण येथे २९ मार्च रोजी सायंकाळी साडेतीनच्या सुमारास पोहायला गेलेले संजय करंबेळे हे बुडून मृत्युमुखी पावले. त्यांना पाण्यातून बाहेर काढून संजय ग्रामीण रुग्णालयात प्रवीण डाफळे यांनी नेले होते. या घटनेची फिर्याद प्रवीण यांनीच दिली होती. दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणार प्रवीण डाफळे याने आत्महत्येचे पाऊल का उचलले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.