शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत दापोलीचे एक पाऊल पुढे

By admin | Updated: December 12, 2015 00:18 IST

स्वच्छता अभियानाला बळकटी : स्वच्छ भारत अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १२० सार्वजनिक शौचालये

शिवाजी गोरे- दापोली--देशभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून, या अभियानामुळे सर्वत्र जनजागृती व्हायला लागली आहे. असे असले तरीही अनेक शहरांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था दिसून येत आहे. ‘लोकमत’ने रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिकांतील शौचालय स्वच्छता यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शहरांमध्ये शौचालयांची दुरवस्था आढळून आली. मात्र, याला दापोली शहर अपवाद आहे. दापोली शहरातील शौचालये सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून, स्वच्छतेबाबत दापोली नंबर वन असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर जुन्या काँगे्रस सरकारच्या निर्मळ ग्रामयोजनेत बदल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ हाती घेतले आहे. सुरुवातीच्या काळात या मोहिमेला बरीच प्रसिद्धी देण्यात आली. याचे आता सकारात्मक पडसाद दिसू लागले असून, राज्यातील अनेक नगरपालिकांना २ आॅक्टोबर गांधी जयंती दिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने स्वच्छता मोहीमेवर अधिक भर दिला आहे. उघड्यावरील शौचामुळे होणारे आजार व मानहानी यातून सुटका करण्यासाठी ‘घर तेथे शौचालय’ अशी योजनासुद्धा आखली आहे. दापोली शहरात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, दापोली नगरपंचायत शंभर टक्के हागणदारी मुक्त शहर बनले आहे. या शहरातील केवळ १२० कुटुंबांकडे घरगुती शौचालये नाहीत. ही कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. दापोली शहरात एकूण २४ सार्वजनिक शौचालये आहेत. स्त्री व पुरुष अशी शौचालये आहेत. दापोली शहराची गरज लक्षात घेऊन या शौचालयात ५०० लीटर पाण्याची टाकी ठेवण्यात आली असून, २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.३ लाख ५० हजार रुपये खर्च करून दापोली शहरातील सर्व शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शौचालयांची रंगरंगोटी व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. सार्वजनिक शौचालयांमुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. स्त्रियांची सार्वजनिक शौचालयेसुद्धा सुस्थितीत ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाही.दापोली शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्याने त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहराच्या मध्यभागी केळस्कर नाका येथे ३३ लाख रुपये खर्चून सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. या सुलभ शौचालयाची वर्क आॅर्डर देण्यात आली आहे. या सुलभ शौचालयामुळे दापोली शहरात येणाऱ्या पर्यटक व तालुक्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. दापोली शहरात एस. टी. आगारात पूर्वीचे एक शौचालय आहे तसेच दुसरे शौचालय झाल्यास लोकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.दापोली नगरपंचायतीने प्लास्टिक मुक्तीनंतर सर्वच स्तरावर आघाडी घेतली असून, शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून स्वच्छता मोहिमेवर अधिक भर देण्यात येत आहे. गटारे वेळीच साफ करून कचरा घंटागाडीतून गोळा करण्यात येत असल्याने रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण घटले आहे. आरोग्याची काळजी : शहर हागणदारी मुक्तदापोली नगरपंचायतीने जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून, दापोली शहरातील जनतेला स्वच्छ पाणी, वीज, पायाभूत सुविधा पुरविल्या आहेत. दापोली शहर शंभर टक्के हागणदारी मुक्त शहर असून, शहरात केवळ १२० कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. त्यांना दापोली नगरपंचायतीमार्फत शौचालये बांधून देण्यात येणार आहेत.- जावेद मणियार, नगराध्यक्ष.तक्रारी नाहीतदापोली शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्थिती चांगली असून, शौचालयाबाबत नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी नसल्याचे दिसत आहे.