शिवसैनिक गप्प बसणार नाहीत - गजानन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:27+5:302021-05-10T04:32:27+5:30

रत्नागिरी : माजी आमदार बाळ माने यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावरील बिनबुडाचे आराेप करणे थांबवावे अन्यथा शिवसैनिक म्हणून ...

Shiv Sainiks will not remain silent - Gajanan Patil | शिवसैनिक गप्प बसणार नाहीत - गजानन पाटील

शिवसैनिक गप्प बसणार नाहीत - गजानन पाटील

Next

रत्नागिरी : माजी आमदार बाळ माने यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावरील बिनबुडाचे आराेप करणे थांबवावे अन्यथा शिवसैनिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य व शिवसेना रत्नागिरी तालुका संघटक गजानन पाटील यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, मतदारांनी उदय सामंत यांना भरघोस मतांनी निवडून दिले. याबाबत राज्यपालांनी देखील त्यांचे भरभरुन कौतुक केले. मंत्री सामंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे भाजपा नेते बाळ माने यांनी मंत्री सामंत यांच्यावरील बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा दिला. माने यांचे भाजपामध्ये सध्याचे स्थान काय आहे याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. काही महिन्यापूर्वी बाळ माने यांना जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवून त्यांच्या जागी ॲड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून माने यांचा तीळपापड होतो, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sainiks will not remain silent - Gajanan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.