लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:56 IST2025-07-12T12:56:15+5:302025-07-12T12:56:39+5:30

रत्नागिरी : बारा दिवसांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही ...

She got married and ran away with the jewelry and money in Ratnagiri | लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना

लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : बारा दिवसांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही घटना गुरुवारी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील पाली-मोहितेवाडी येथे घडली.

याबाबत तिचे सासरे दत्ताराम राजाराम मोहिते (वय ५९, रा. मोहितेवाडी-पाली, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मुलाचे २८ जून २०२५ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर तिने सासरे दत्ताराम मोहिते यांचा विश्वास संपादन केला.

मात्र, गुरुवारी सकाळी ११:५० वाजण्याच्या सुमारास बेडरुममधील कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलूप बंद पेटीतील ३ लाख २ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ६० हजार असा एकूण ३ लाख ६२ हजारांचा ऐवज लांबवला.

Web Title: She got married and ran away with the jewelry and money in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.