शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तायक्वाॅंदो स्पर्धेमध्ये संगमेश्‍वर तालुक्याने पटकावला मानाचा फिरता चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते संगमेश्वर तालुक्याला मानाचा फिरता चषक प्रदान केला. लोकमत न्यूज नेटवर्क देवरुख : खेड ...

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते संगमेश्वर तालुक्याला मानाचा फिरता चषक प्रदान केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

देवरुख : खेड येथे जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वाॅंदो स्पर्धा २०२१ आयाेजित करण्यात आली हाेती. ही स्पर्धा स्पेशल, सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर व सीनिअर अशा पाच वयोगटांमध्ये विभागलेली होती. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्याने पदकांची लयलूट करत मानाचा फिरता चषक पटकावला.

नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तायक्वाॅंदो जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकठेश कररा, जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण कररा, जिल्हा संघटना खजिनदार शशांक घडशी, जिल्हा संघटना उपाध्यक्ष विठ्ठलदास लोखंडे, पंच प्रमुख भरत करर्रा, खेड तालुक्याचे कुणाल चव्हाण, प्रशांत कांबळे व अजय निंगडेकर यांच्या आयोजनाखाली पार पडली.

या जिल्हा स्पर्धेसाठी जिल्हाभरातून सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये नगरपंचायत देवरुख तायक्वाँदो क्लब, पी. एस. बने तायक्वाँदो क्लब, साडवली, दादासाहेब सरफरे विद्यालय तायक्वाँदो क्लब, बुरंबी, तायक्वाँदो क्लब साखरपा, लायन्स तायक्वाँदो क्लब, संगमेश्‍वर आणि तायक्वाँदो क्लब निवे च्या ७५ खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्याने फाईट व पुमसेमध्ये ३६ सुवर्ण, ३० रौप्य व १९ कांस्यपदके पटकावत पदकांची लयलूट करत, पुमसेमध्ये प्रथम क्रमांक, फाईटमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत मानाचा समजला जाणारा फिरता चषक सलग तीन वेळा पटकावून स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.