शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनबाबत अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

दापोली : जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार असल्याच्या अफवेमुळे ग्रामीण भागात संभ्रमावस्था वाढली आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. परंतु ...

दापोली : जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार असल्याच्या अफवेमुळे ग्रामीण भागात संभ्रमावस्था वाढली आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्याप कोणत्याही नव्या सूचना आलेल्या नाहीत, अशा प्रकारचे संदेश विविध माध्यमांवर फिरत असल्यामुळे संभ्रमावस्था वाढली आहे.

पाइपलाइन जोडली

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्लेला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन अज्ञात व्यक्तीने काही दिवसांपूर्वी तोडली होती. या घटनेचा पंचनामा करून पुन्हा ही पाइपलाइन जोडण्यात आल्याचे उपसरपंच महेश महाडिक यांनी सांगितले. आंजर्लेला खुटीचे पाणी या ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जातो.

ब्लड लाइन संघटनेची स्थापना

चिपळूण : कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे ही गरज ओळखून येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल टाकळे व सहकारी मित्रांनी फक्त सामाजिक असणाऱ्या २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांना ब्लड लाइन संघटनेच्या माध्यमातून एकत्रित केले आहे. या संघटनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्त, प्लेट्स रक्तपेढीच्या माध्यमातून तत्परतेने देण्याच्या संकल्प आहे.

सापाला जीवदान

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील भालचंद्र कोकणे यांनी गांडूळखत युनिटला संरक्षण म्हणून मच्छीमार जाळी लावली आहे. या जाळीत अडकलेल्या सापाला आंजर्ले येथील सर्पमित्र मणित बाईत व वैभव बाईत यांनी सोडवून जीवदान दिले. या जाळीत धामण जातीचा साप अडकला होता.

पुस्तकांचा आधार

रत्नागिरी : कोविड रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात; मात्र रुग्णालयातील वातावरण व अन्य रुग्णांची परिस्थिती पाहून कोविड रुग्णांच्या मनात नकारात्मक विचार येतात. या नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी पुस्तकांची साथ महत्त्वाची असून, कोविड रुग्णांना रुग्णालयातच पुस्तके उपलब्ध करून देण्याचा उपक्रम शहरातील मोरेश्वर जोशी व तसेच कै. कुसुमताई अभ्यंकर सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट, श्रीकृष्ण साबणे व हेल्पिंग हॅण्डच्या माध्यमातून सुरू केला.