शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भात उत्पादनात होणार घट

By admin | Updated: July 28, 2015 00:28 IST

वाढ खुंटली : जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण

रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी यावर्षी कमी पावसामुळे भाताच्या उत्पादनात किमान १५ ते २० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भात लागवडीचे समाधान मिळाले असले तरी भाताची प्रत्यक्ष वाढ खुंटली आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, दुय्यम शेती नागलीची केली जाते. पावसावर अवलंबून असलेली भातशेती लागवड प्रक्रिया यावर्षी पावसाअभावी रखडली आहे. पाणथळ तसेच पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रातील भात लागवड प्राधान्याने पूर्ण करण्यात आली तरी डोंगराळ भागातील शेती लागवडीस मात्र विलंब झाला. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते. त्यापैकी ४४ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. नागली पिकाची १४ हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येत असली तरी अद्याप ४ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड पूर्ण झाली आहे. जुलै महिना संपला तरी लागवडीची कामे अद्याप प्रलंबित आहेत. शिवाय लागवडीसाठी विलंब झाल्यामुळे भातरोपांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अजूनही म्हणावा तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. उन्हामुळे रोपे पिवळट पडली आहेत. शिवाय भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे फुटवे अद्याप चांगल्या प्रकारे झालेले नाहीत. फुटवेच झाले नसल्यामुळे पुढे भाताच्या लोंबीवर त्याचा परिणाम होणार आहे. भाताची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ भात लागवडीचे समाधान लाभत आहे. त्यामुळे यावर्षी भाताची उत्पादकता घटण्याचे संकेत दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)