लांजातील स्मशानभूमीसाठी दिली माेफत लाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:42+5:302021-05-11T04:32:42+5:30

लांजा : लांजा तालुका काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांच्यातर्फे कोरोना आजाराने मृत्यू होणाऱ्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांजा नगरपंचायतीच्या अधिपत्याखाली ...

The only wood given for the cemetery in Lanja | लांजातील स्मशानभूमीसाठी दिली माेफत लाकडे

लांजातील स्मशानभूमीसाठी दिली माेफत लाकडे

लांजा : लांजा तालुका काँग्रेसचे नेते

अविनाश लाड यांच्यातर्फे कोरोना आजाराने मृत्यू होणाऱ्या नागरिकांवर

अंत्यसंस्कार करण्यासाठी लांजा नगरपंचायतीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या

स्मशानभूमीसाठी एक डम्पर लाकडे मोफत देण्यात आली.

लांजा तालुक्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या

प्रमाणात वाढत असून, कोरोनाने मृत्यू होणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढत

आहे. गत महिन्यात ४० जणांचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा

बिकट परिस्थितीत कोरोनाने मृत्यू होणाऱ्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारांसाठी लाकडांची असलेली गरज लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी

उपमहापौर अविनाश लाड यांनी एक डम्पर लाकडांची मदत केली़ ही

लाकडे लांजा स्मशानभूमी येथे तहसीलदार समाधान गायकवाड यांच्या

मार्गदर्शनाखाली देण्यात आली. यावेळी स्थानिक नेते

श्रीकृष्ण तथा बब्या हेगिष्टे उपस्थित हाेते़

Web Title: The only wood given for the cemetery in Lanja